हिरकणी महिला उत्कर्ष प्रतिष्ठाणच्या वतीने गोैरी सजावट स्पर्धेचे आयोजन सहभागासाठी मोबाईल वरूनच चित्रीकरण मागविणार

0
101

 

चिखली: विशेष प्रतिनिधी मनोज बागडे.
गौरी, गणपतीचे दिवसात सर्वत्र उत्साहाला उधान अशी स्थिती असते, परंतु या वर्षी कोरोनामुळे सामाजिक जिवनावर अनेक बंधणे लादल्या गेली असुन हे सर्व उत्सव घरगुती स्वरूपात साधेपणाने साजरे करण्याचे निर्देश असले तरी प्रत्येकच घरात गौरींच्या आगमन प्रसंगी घरात जी करायची ती सजावट व घराचे सुशोभीकरण हे सर्व नियम पाळुन केल्याच जाणार आहे. म्हणुन दरवर्षी गौरी सजावटी साठी हिरकणी महिला उत्कर्ष प्रतिष्ठाण विविध स्पर्धा आयोजित करीत आली आहे. त्याच परंपरेनुसार याही वर्षी गौरी सजावट स्पर्धेेचे आयोजन करण्यात आले आहे. फक्त यावेळेस घरोघरी सजावट स्पर्धेत सहभागी होणा-या महिलांच्या घरी परिक्षक न जाता त्यांनी केलेल्या सजावटीसह स्वतःची सेल्फी काढुन किंवा एक मिनीटीचा व्हिडोओ काढुन प्रतिष्ठाणकडे पाठवायचा आहे. घरी राहा आणी सुरक्षीत राहा या सावधगिरीतुन ही स्पर्धा आॅनलाईन घेण्यात येणार असुन या स्पर्धेत सहभागी होणारे स्पर्धेंकांना आकर्षक बक्षिसे देण्याची योजना हिरकणी प्रतिष्ठाणने केेलेली आहे.
चिखली शहरातील महिलांच्या कल्पकतेला आणि सृजणषिलतेला वाव मिळावा म्हणून हिरकणी प्रतिष्ठाणने आयोजित केलेल्या गौरी सजावट स्पर्धेमध्ये आकर्षक सजावट करत असतांना मखर डेकोरेशन, रांगोळी, फुलोरा, त्याचबरोबर गौरींची आकर्षक वेशभुशा व अलंकार आशा अनेक छेटा दर्शविणा-या सेल्फी किंवा एक मिनीटीचा व्हिडीओ खालील दिलेल्या मोबाईल नंबरवर दिनांक 27 आॅगस्ट पर्यंत रवाना केले जावे. घरी सुरक्षीत राहुन जास्तीत जास्त संख्येने महिलांनी सहभाग घ्यावा. अशी विनंती हिरकणी महिला प्रतिष्ठाणच्या संस्थापक अध्यक्षा अॅड.सौ. वृषालीताई बोंद्रे यांनी केली आहे.
या स्पर्धेत सहभागी होवू ईच्छीनाऱ्या महिलांना आपल्या घरच्या गौरी सजावटीचे चित्रीकरण करून दिनांक 27 आॅगस्ट 2020 या तारखेपर्यंत खालील नंबरवर पाठवावे 7588419533, 9168577111, 8275232195, 9970516983, 9850467324, 7588564775, 8208765185