Home महाराष्ट्र कोरची पंचायत समिती गटविकास अधिकारी नियोजन शुन्य कारभारामुळे शिक्षकांना गेल्या तीन महिन्यापासून...

कोरची पंचायत समिती गटविकास अधिकारी नियोजन शुन्य कारभारामुळे शिक्षकांना गेल्या तीन महिन्यापासून पगार नाही.

546

 

ऋषी सहारे
कार्यकारी संपादक

कोरची – गडचिरोली जिल्हा परिषद कडून पगार संबंधिची संपूर्ण कार्यवाही झाल्यानंतरही महाराष्ट्र शासनाने पोळा व गणेश चतुर्थी अगोदर शिक्षकांचे पगार करण्याचे आदेश दिले असताना गटविकास अधिकारी देवरे यांच्या नियोजन शुन्य कारभारामुळे व शिक्षकांबद्दलच्या द्वेषामुळे गेल्या तीन महिन्यापासून पगार न झाल्याने पोळा ,गणेश चतुर्थी सारख्या मोठ्या सणा मध्ये पगारा पासुन वंचित असल्याने शिक्षकां मध्ये गटविकास अधिकारी देवरे यांच्या विरोधात संतापाची लाट निर्माण झाली आहे .
गडचिरोली जिल्ह्यातील माहितीनुसार कुरखेडा व देसाईगंज सह इतर पं.स.अंतर्गत शिक्षकांचे गेल्या तीन महिन्याचे महिण्याचे वेतन पोळा सणा पुर्वी करण्यात आले. कोरची पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी देवरे हे मुख्यालयी नसल्याने त्यांच्या वेतन देयकावर स्वाक्षऱ्या होऊ शकल्या नाही. पर्यायाने शिक्षकांचे वेतन रखडले. गट शिक्षणा अधिकारी आणि गटविकास अधिकारी हे मुळातले शिक्षण खात्यातले नसल्याने त्यांना शिक्षकांच्या अडचणी बद्दलची जाणीव नाही. त्यामुळे गणेश चतुर्थीलाही वेतन होण्याची शिक्षकांची आशा मावळली आहे. शिक्षकांना नियमाचा धाक दाखवून नेहमीच कारवाई ची भिती दाखवणाऱ्या गटविकास अधिकारी देवरे यांनी मुख्यालय सोडतांना रितसर परवानगी घेतली का ? नसेल घेतली तर त्यावर प्रशासन कारवाई करेल का ? परवानगी घेतली असेल तर त्यांना मुख्यालयी हजर होताच संस्थात्मक कोरंटाईन केल्या जाईल का? याकडे सर्वांचे लक्ष
लागले आहे. तर गडचिरोली जिल्ह्यातील शिक्षकांना नाय हकासाठी लढण्यारया संघटनेचे पदाधिकारी कोरची तालुक्यातील ग्रामीण भागातील शाळेत कार्यरत असून आता शिक्षकाच्या अडचणीतवर गप्प का असा प्रश्नही शिक्षक उपस्थित करीत आहेत.
कोरची पंचायत समिती गटविकास अधिकारी हे रुजू झाल्या पासून पंचायत समितीच्या मासिक सभेत घेतलेल्या ठरावाची अंमलबजावणी करीत नाही व कर्मचारी वर्गाला स्वताच्य प्रसिद्ध करीता काम करवून घेता पण प्रत्यक्षात अंमलबजावणी करती नाही गेल्या तीन महिन्यांपासून शिक्षकांचे पगार दिले नाही हे खूप ग़भीर बाब आहे शिक्षकांचे पगार ताबडतोब करावे, गटविकास अधिकारी देवरे यांच्या वर अविश्वास प्रस्ताव मंजूर केला पण जिल्हा परिषदने कार्यवाही केली नाही तरी वरिष्ठांनी लक्ष केंद्रित करून कार्यवाही करावी. अशी
सदाराम नुरुटी सदस्य पंचायत समिती कोरची यांनी म्हटले असल्याचे समजते.

Previous articleकोंढाळा येथील युवक – युवतींचा पुढाकार-“संचारबंदीच्या काळात जीवाची पर्वा न करता देत आहेत शिक्षणाचे धडे”
Next articleमो . कलाम शेख (बबलू भाई हुसैनी) यांची भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाच्या गडचिरोली जिल्हाअध्यक्षपदी नियुक्ती.