कोंढाळा येथील युवक – युवतींचा पुढाकार-“संचारबंदीच्या काळात जीवाची पर्वा न करता देत आहेत शिक्षणाचे धडे”

238

सत्यवान रामटेके(देसाईगंज ग्रामीण तालुका प्रतिनिधी):-
आजच्या घडीला शिक्षणाला इतके महत्त्व प्राप्त झाले आहेत की, “शिक्षण हे वाघिणीचे दुध असुन,ते प्राशन केल्याने वाघासारखे गुरगुरल्या शिवाय राहणार नाही”.अशीच स्थिती आज समोरासमोर येऊन ठेपली असल्याने, संचारबंदीच्या काळात अनेक लहान विध्यार्थी,मुले व मुली यांच्यावर गदा आली.एकीकडे शासनाने सर्व शिक्षण आणलाईन पद्धतीने सुरू ठेवावे असे आदेश निर्गमित केले मात्र आणलाईन धडे मिळणार कुणाला असाही प्रश्न निर्माण होत होता.तसेच जिल्हा परिषद शाळाही बंद मग करावे तर काय? याकरिता गावातील कुठल्याही वर्गातील विध्यार्थी शिक्षणाचे धडे घेण्यासाठी वंचित राहू नये याकरिता, कोंढाळा येथील सुशिक्षित युवक व युवती यांनी स्वतः पुढाकार घेऊन त्यांना शिक्षणाचे धडे देण्यासाठी सरसावले आहेत.
सुरुवातीला गावातील काही जणांचा विरोध होता, मात्र या विरोधाला न जुमानता,आपले कार्य ते आजही करीत आहेत.यासाठी त्यांनी गावातीलच महत्वाची मुख्य ठिकाणे निवडली असून,त्यामध्ये समाजमंदिर,बौध्द विहार,वन व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत कार्यालय व इतर अनेक ठिकाणी गावातील युवक व युवती वर्ग शिक्षणाचे धडे देत आहेत.या कार्याकरिता सर्वत्र त्यांचे कौतुक केले जाते आहे.