वणी : परशुराम पोटे
तालुक्यातील तेजापुर येथे एका महिलेने स्वता विष प्राषन करुन ६ वर्षिय मुलाला विष पाजल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आली.
सोनल किसन नरड(२६)या महिलेने दि.२१ आँगष्टला दुपारी १२ वाजताचे सुमारास स्वताच्या रहात्या घरी विष प्राषन केले. व मुलगा पियुष किसन नरड(६)या बाळाला सुद्धा पाजले. या घटनेची माहिती कुटुंबातील व्यक्तिंना मिळताच त्यांनी ताबडतोब वणीतील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान मुलाची प्रक्रुती धोक्याबाहेर झाली असुन मात्र त्याची आई सोनल आय.सि.यु मध्ये उपचार घेत असल्याची माहिती मिळाली आहे. सोनल ने स्वता विष प्राषन करुन आपल्या चिमुकल्या बाळालाही विष का पाजले? याबाबतची माहिती मिळु शकली नाही. पुढिल तपास पोसीस करित आहेत.