पत्रकारासोबत असभ्य वर्तन करणार्या ग्रामसेवकावर कारवाई करा,प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे तहसीलदारासह बिडिओंना निवेदन

148

 

वणी : परशुराम पोटे

एका नागरीकाचा रहिवाशी दाखला हवा म्हणुन विचारणा केली असता तुम्ही दाखला मागणारे कोन? असा उद्धट जबाब एका पत्रकाराला देणार्या ग्रामसेवकावर तात्काळ कारवाई करावी,अशा मागणीचे निवेदन प्रेस संपादन व पत्रकार सेवा संघ मारेगावच्या वतिने देण्यात आले.
तालुक्यातील गाडेगाव – चनोडा गटग्रामपंचायत मध्ये निलेश म्हसे हे ग्रामसेवक कार्यरत आहेत.त्यांना गावातीलच निखील काकडे यांनी रहिवासी दाखला मिळणेसाठी विचारना केली असता दाखला मिळाला नाही. यासंदर्भात प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे यवतमाळ जिल्हा सरचिटनिस सचिन काकडे यांनी ग्रामसेवकाला भ्रमनध्वनीवरुन विचारणा केली असता ‘तुम्ही विचारणारे कोन?असे उलट उत्तर दिले.याबाबत त्यांना पत्रकार असल्याची माहिती दिली असता मला पत्रकाराशी काहीही देणे घेणे नाही.असे उद्धट उत्तर दिले.
वास्तविक ग्रामसेवकावर ज्या गावाची जबाबदारी असते त्या गावांना आठवड्यातुन दोनदा तरी भेटी देवुन जनतेचे तसेच गावातील समस्यांचे निराकरण करणे आवश्यक असते परंतु म्हसे सारखे काही ग्रामसेवक हे उंटावरुन शेळ्या हाकलण्याचे काम करत आहे.गावात येवुन योग्य सेवा न देणे,जनतेची कामे विलंबनाने करणे,सामान्य व्यक्तींशी उद्धटपने वागणार्या ग्रामसेवकावर तात्काळ कारवाई व्हावी अशा प्रकारचे निवेदन प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्राज्य च्या मारेगाव शाखेतर्फे येथिल तहसिलदार तथा बिडिओ यांना देण्यात आले.यावेळी सचिन काकडे,अनंता गोवर्धन,पंकज नेहारे,सचिन मेश्राम,सुदर्शन टेकाम,आनंद नक्षिणे,यांचेसह पत्रकार बांधव उपस्थित होते.