अकोट शहर प्रतिनिधी
स्वप्नील सरकटे
अकोट तालुक्यातील ग्राम पणज येथील सर्वांचे परीचीत
भोईराज भवन पणज येथे दर्शन कॉफी शॉप चे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आकोट चे उपविभागीय अधिकारी गजानन सुरंजे साहेब,प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय किर्तनकार सत्यपाल महाराज यांचे पट्टशिष्य संदीपपाल महाराज तसेच प्रसिद्ध उद्योगपती विजयकुमार दातीर यांची उपस्थिती होती. भोईराज किसनराव तायडे यांचे प्रतिमापूजन व दिपप्रज्वलन करून पाहुण्यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन तंटामुक्ती अध्यक्ष रामदास तायडे, भोईराज कॅलेंडर निर्माता रतनलाल भोई, भोईराज गृपचे गणेशराव भारसाकडे, मुकेश गुप्ता यांनी केले. कार्यक्रमास शालिग्रामजी तायडे, संजय साविकार, चंद्रशेखर गुप्ता, निखिल साविकार, मुकेश लोणकर, अनिल रोकडे,कृणाल साविकार वैभव मांडवे, अभिजीत देशमुख, माधवराव बोचे, साळोजी कारले, भिमराव साविकार संजय गवळी पत्रकार दिनेश बोचे पत्रकार व गावकरी मंडळी उपस्थित होते.जागतिक कोरोना महामारी मुळे उद्भवलेल्या परिस्थिती मुळे सुरक्षीत अंतर राखून कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे आयोजन डॉ. मयुर तायडे तर आभार प्रदर्शन कॉफी शॉप चे प्रोप्रायटर डॉ. दर्शनकुमार तायडे यांनी केले.