सावरा येथील कुशल कारागीर नरेश पुनकर यांनी साकारली श्री गणरायाची मुर्ति

0
118

 

अकोट शहर प्रतिनिधी
स्वप्नील सरकटे

अकोट तालुक्यातील ग्राम सावरा येथील कुशल कारागीर नरेश पुनकर यांनी
कोरोनाच्या संकट काळात
सर्व व्यवसाय बंद असतांना लाँकडाऊन मधे हाताला काम नव्हते अशा परिस्थितीत सावरा येथील नरेश पुनकर यांनी गेल्या काही दिवसांत पारंपरिक शेतीअवजारांची प्रतीकृती बनवून एक कुशल कारागीराची नवी ओळख निर्माण केली आहे.
असे नरेश पुनकर यांचा एक अजुन नवा उपक्रम व नवी कला. त्याने लाँकडाऊन मधे हार न मानता ,घरीच मातीच्या सुंदर अशा गणपती मुर्ती तयार केलेल्या आहेत. विशेष म्हणजे गणपती मुर्ती च्या पायाखाली कोरोनाचे चित्र काढून डाव्या हातानी त्रिशूल ने त्याला नष्ट करण्याचा प्रयत्न करीत आहे असे दर्शविले आहे.
खरोखरच पुनकर यांची कला यांचा आदर्श नवीन पिढीसाठी महत्त्व पुर्ण ठरत आहे.