“रत्नागिरीचा राजा” सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ रत्नागिरी तर्फे आठवडा बाजार येथे श्री देव गणपती “रत्नागिरीचा राजा” ची प्रतिष्ठापना मुर्ती दिड फुटी उंचीची तसेच गणेशोत्सव दिड दिवसाचा. असणार

167

 

प्रतिनिधी / निलेश आखाडे.

रत्नागिरी :- “रत्नागिरीचा राजा” सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, रत्नागिरी या मंडळाच्या वतीने रत्नागिरी शहरातील आठवडा बाजार, रत्नागिरी येथील नगर परिषदेच्या शॉपिंग कॉम्प्लेक्स मधील दुकानाच्या (नवलाई ट्रॅव्हल्स) गाळ्यामध्ये श्री देव गणपती “रत्नागिरीचा राजा” दिड दिवसांसाठी झाला विराजमान.
यावर्षी कोरोना या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो असल्यामुळे करण्यात आलेल्या लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर यंदा श्री देव गणपती “रत्नागिरीचा राजा” गणेशोत्सव आठवडा बाजार येथे अत्यंत छोट्या प्रमाणात साजरा करण्यात येणार असुन लोकवर्गणी जमा करणार नसल्याचे मंडळाकडुन ठरविण्यात आले आहे.
दि. 22 ऑगस्ट 2020 ते 23 ऑगस्ट 2020 असा दीड दिवसाचा गणेशोत्सव साजरा करण्याचे मंडळाकडून निश्चित केले आहे.
या मंडळाचे वतीने श्री देव गणपती “रत्नागिरीचा राजा” सार्वजनिक गणेशोत्सव करण्याचे हे 13वे वर्ष आहे. दि. 22 ऑगस्ट 2020 रोजी गणेश चतुर्थी दिवशी श्री देव गणपती “रत्नागिरीचा राजा” च्या मूर्तीची प्रतिष्ठापना होईल तसेच दुसऱ्या दिवशी म्हणजेच 23 ऑगस्ट 2020 दुपारी 3 वाजता श्री देव गणपती “रत्नागिरीचा राजा” गणेश मूर्तीचे कोरोना या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर शासनाने आखलेल्या नियमानुसार विसर्जन करण्यात येणार आहे.
श्री देव गणपती “रत्नागिरीचा राजा” ची मुर्ती रत्नागिरीचे सुप्रसिद्ध मूर्तिकार विनूशेठ पाथरे, गोखले नाका, रत्नागिरी यांनी साकारली आहे. कोरोना या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर मंडळाकडून शासनाने दिलेल्या खालील नियमांचे पालन करून सुरक्षितता राखण्यासाठी मंडळ कटिबद्ध राहणार असल्याचे मंडळाचे प्रमुख राजनजी सुर्वे, जीतु जैन, राजेशजी मयेकर, गजेंद्रशेठ पाथरे, योगेशजी कोरगावकर, अथर्व पांगम, सिध्दराज रेडीज, अमितजी विलणकर, सुहासशेठ शिंदे, महेंद्रजी सुर्वे, बाबु मातोंडकर, विकू जैन, रवींद्रजी खेडेकर, दत्तगुरू कीर, रमेश बोराना, जिग्नेश पटेल, राहुलजी भाटकर, विनीत सुर्वे, अमित चव्हाण, दुर्वेश पांगम, राहुलजी सुर्वे, महेश मातोंडकर, शिवप्रसाद खानवीलकर, बंड्या सुर्वे, संदिप पावसकर, मनोजजी कीर, मंगेशजी धुळप, नंदुशेठ मोरे, संतोषजी भाटकर, रमाकांतजी आयरे आदींनी सांगितले. भक्तांना बाहेरुनच गणेश मूर्तीचे दर्शन घेता येणार आहे. श्री देव गणपती “रत्नागिरीचा राजा” च्या मूर्तीला हार, फुले अर्पण करता येणार नाहीत. गणपतीच्या विसर्जनाला 5 कार्यकर्तेच उपस्थित राहणार आहेत.

*दखल न्यूज भारत*