मा.श्री.देवेंद्र फडणवीस यांची जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा इथं भेट

146

प्रतिनिधी-ऋग्वेद येवले
निलय झोडे
भंडारा-राज्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असले तरी भंडारा जिल्हाची नेमकी काय परिस्थिती आहे याची माहिती महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते श्री.देवेंद्र फडणवीस व भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश महामंत्री श्री.चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथील प्रत्यक्ष कोव्हीड सेंटरला भेट देऊन परिस्थिती जाणून घेतली.
कोव्हीड युध्दातील भंडारा जिल्ह्याचे आतापर्यंत काम समाधानकारक असले तरी कोरोनाची साथ आणि मृत्यू रोखण्यासाठी पुढील एक महिना महत्त्वाचे असल्याचे विरोधी पक्षनेते मा.श्री.देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
यावेळी भंडारा-गोंदिया लोकसभेचे खासदार मा.सुनिल मेंढे,भंडारा-गोंदिया विधानपरिषदचे आमदार या.परिणय फुके, जिल्हाधिकारी कदम साहेब जिल्हा पोलिस अधिक्षक तसेच प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.