Home अकोला टोईंग पथकाच्या वाहन उचलण्याच्या कार्यवाह्या विरुद्ध वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तक्रार

टोईंग पथकाच्या वाहन उचलण्याच्या कार्यवाह्या विरुद्ध वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तक्रार

290

 

अकोट शहर प्रतिनिधी स्वप्नील सरकटे

वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्हा – महानगर, महिला आघाडी, सम्यक विध्यार्थी आंदोलन आणि युवक आघाडीच्या वतीने शहरातील बेताल वाहतुकीला व पार्किंगला वळण लावण्याच्या नावावर जिल्हा पोलीस अधिक्षक ह्यांचे आदेशाने नेमलेले टोईंग पथकाने मनमानी व नियमबाह्य वाहन उचलण्याच्या कार्यवाह्या सुरु केल्या आहेत.त्यामुळे नागरिकांना विशेषतः महिला आणि ग्रामीण भागातील नागरिकांना ह्यांचा प्रचंड त्रास होत आहे.ह्या विरोधात आज वंचितने शहर वाहतूक निरीक्षक ह्यांना निवेदन सोपविण्यात आले.
शहरात पार्कीग झोन निश्चित करण्यात आलेले नाही.पिवळे पट्टे मारून नो पार्किंगच्या बाबत आखणी करण्यात आलेली नाही.त्यामुळे नेमक्या गाड्या कुठे लावाव्यात ह्याचा नागरिकांना बोध होत नाही.पार्कींग व पिवळ्या पट्ट्या बाबत आपल्या कर्मचा-यांना विचारणा केली असता ती महानगर पालिकेची जबाबदारी असल्याचे सांगून हाथ झटकले जातात.ही वाहतूक निरीक्षण आणि व्यवस्थापनाच्या नावावर सुरु असलेली दादागिरी आहे.
टोईंग पथक म्हणून कार्यरत असलेल्या खाजगी व्यक्तीने आपल्या माणसा मार्फत रस्त्याच्या कडेला लावलेली वाहन उचलण्याची पद्धत पाहली की पोलिसांनी हे पथक बेताल वाहतुकीला व पार्किंगला वळण लावण्यासाठी नेमले आहे की गुंडागर्दी करण्यासाठी असा प्रश्न जिल्हातील नागरिकांना पडतो.मुळात जिल्हा पोलीस अधीक्षक ह्यांचे सोबत झालेल्या करारनाम्या नुसार टोईंग आणि गाड्या उचलण्यासाठी नेमलेल्या पथकाला नियम घालून दिलेले आहेत.रस्त्याच्या कडेला उभे असलेली वाहने जर नियमबाह्य उभे केली असतील तर पथकाने आधी लाऊडस्पिकर व्दारे ही वाहने तात्काळ काढून घेण्याची सूचना दिली पाहिजे.लाऊडस्पिकर वर सूचना देऊन देखील नागरिक वाहने काढत नसतील तर मग पथकाने कार्यवाई केली पाहिजे.असे करारनाम्यात नमूद आहे.परंतु टोईंग पथक स्थापन झाल्या पासून वाहने उचलणा-या वाहनावर कधीही लाऊडस्पिकर लावण्यात आलेला आढळत नाही.आजही हे वाहन लाऊडस्पिकर शिवाय शहरात फिरते.पूर्वसूचना न देता वाहने उचलण्यात येतात.हा जिल्हा पोलीस अधिक्षक ह्यांच्या सोबत केलेल्या कराराचा भंग आहे.खाजगी व्यक्ती आणि त्यांचे कर्मचारी मनमानी करीत जनतेला वेठीस धरत आहेत.त्याला पोलीस विभाग पाठीशी घालत आहे.ही बाब योग्य नाही.त्यामुळे लाऊडस्पिकर लावून त्यावर पूर्वसूचना दिलया शिवाय कार्यवाही होऊ नये ह्या नियमाचे पालन टोईंग पथकाने करावे अशी पक्षाची मागणी आहे.

कोरोना संसर्गामुळे उदभवलेल्या आपत्कालीन परिस्थितीच्या अनुषंगाने केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या वतीने १ मे २०२० रोजी काढलेल्या अधिसूचने नुसार राज्यात तसेच देशभरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनच्या पार्शवभूमीवर मोटार वाहन अधिनियम १९८८ व केंद्रीय मोटर वाहन नियम १९८९ अंतर्गत वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्र, परवाना व वाहन नोंदणी, विमा, पीयूसी दि. ९ जून २० रोजी इ. कागदपत्रांच्या वैधते बाबत आदेशित करण्यात आले होते.ज्या वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्र, परवाना व वाहन नोंदणी तसेच चालक अनुज्ञप्तीची वैधता १ मे २०२० ते ३०/६/२०२० संपणार होती त्या कागदपत्रांची वैधता ३०/६/२०२० पर्यंत वाढविण्यात आली होती.
पुन्हा लॉकडाऊन वाढविण्यात आल्याने केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालया तीच मुदतवाढ ३० सप्टेंबर २०२० पर्यंत वाढविण्यात आल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक ह्यांचे निदर्शनास आणून देण्यात आले.त्यामुळे पोलीस आणि वाहतूक पोलिसांनी वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्र, परवाना व वाहन नोंदणी, विमा, पीयूसीचे नूतनीकरणाची मागणी करू नये. तसेच वाहनधारकांवर कार्यवाही करू नये अशी मागणी देखील करण्यात आली.पोलिसांनी मोटर वाहन कागदपत्रांची वैधता मुदतवाढीच्या पार्श्वभूमीवर वाहनावर कार्यवाही करू नये ह्यासाठी आदेश काढण्याचा आग्रह धरण्यात आला.नाहक जनतेवर कार्यवाही आणि आर्थिक दंड आकाराला जाऊ नये.जनता गेली चार महिने लॉकडाऊन मुळे जनता त्रस्त आहे.

सोबतच आपल्या वाहतूक शाखेचा कर्मचारी ह्या पथकच्या गस्ती दरम्यान सोबत राहील अशीही अट करारनाम्यात आहे.ब-याचदा आपला कर्मचारी टोईंग वाहनासोबत राहत नाहीत.खाजगी व्यक्तीचे कर्मचारी नागरिक, महिला आणि इतरांशी हुज्जत घालतात.दादागिरी करतात.पोलीस विभागाने वाहतूक नियमन करण्यासाठी आणि बेशिस्त पार्किंगला शिस्त लावण्यासाठी पथक नेमले आहे.पोलीस विभागाच्या सहकार्याने दादागिरी आणि मनमानी करण्यासाठी टोईंग पथक नेमलेले नाही, ह्याची समज टोईंग पथकाला दिली जावी अशी अपेक्षा आहे.जिल्हा पोलीस अधिक्षक ह्यांचे सोबत केलेल्या करारनाम्या नुसार टोईंग पथकाने आपले कार्य पार पाडावे.नागरिकांना नाहक वेठीस धरू नये ह्या साठी वंचित बहुजन आघाडीच्या वतिने सदर निवेदन सादर करण्यात येत आहे.टोईंग पथकाने कायद्याच्या चौकटीत राहून आपले कर्त्यव्य पार पाडले नाही तर पक्षाच्या वतीने टोईंग पथकाच्या मनमानी कारभाराचे विरुद्ध आणि नागरिकाना जाणा-या त्रासाविरोधात जनआंदोलन करण्याचा इशाराही सदर निवेदनात देण्यात आला.ह्यावेळी
वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते राजेंद्र पातोडे, महिला आघाडी प्रदेश महासचिव अरून्धतीताई शिरसाट, जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, महिला जिल्हाध्यक्ष प्रभाताई शिरसाट, सम्यक जिल्हाध्यक्ष राजकुमार दामोदर, महिला महानगर अध्यक्ष वंदनाताई वासनिक,पुर्व महानगर अध्यक्ष शंकरराव इंगळे, पश्चिम महानगर अध्यक्ष कलिम खान पठाण,युवक आघाडी पश्चिम महानगर अध्यक्ष आशिष मांगुळकर,सुरेंद्र तेलगोटे,हितेश जामनिक,सम्राट सुरवाडे,रामाभाऊ तायडे,जीवन डिगे, बुध्दरत्न इंगोले,जिल्हा प्रसिध्दी प्रमुख सचिन शिराळे, राजेश तायडे,आकाश गवई,प्रतुल विरघट,हर्षदा डोंगरे,राजदिप वानखडे, अन्वर शेरा,आकाश अहिरे,अजय पातोडे, निकि डोंगरे,सुमित भांबोरे,रवि उमाळे,नितिन सपकाळ उपस्थित होते.

Previous articleअन,कोरोनाच्या अफवेने वार्डातील रुग्णांच्या नातेवाईकांसह डाँक्टर झाले बेपत्ता! श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील घटना, वार्डात निघाला एक कोरोना पाझिटीव्ह
Next articleमा.श्री.देवेंद्र फडणवीस यांची जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा इथं भेट