अन,कोरोनाच्या अफवेने वार्डातील रुग्णांच्या नातेवाईकांसह डाँक्टर झाले बेपत्ता! श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील घटना, वार्डात निघाला एक कोरोना पाझिटीव्ह

261

 

यवतमाळ/ परशुराम पोटे

यवतमाळ येथिल श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील शल्य चिकीत्सा शास्त्र विभागाच्या वार्ड नं.२४ मध्ये आज दि.२१ आँगष्ट्ला सायंकाळी ६ वाजताचे दरम्यान अचानक कोरोनाचा रुग्न आढळल्याची माहिता मिळताच या वार्डातील डाँक्टरांनी वार्डात भर्ती असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना वार्डाच्या बाहेर काढुन डाँक्टरही बेपत्ता झाले! त्यामुळे रात्री ९ वाजेपर्यंत २४ नंबर वार्डात सन्नाटा पसरला होता. दरम्यान १० वाजता आयसोलेशन वार्डातील टीम आली व १० वाजुन २० मिनिटांनी कोरोना पाझीटीव्ह रुग्णाला घेवुन गेली.यादरम्यान सदर रुग्ण वार्डातील किती रुग्णांच्या संपर्कात आला याबाबत येथिल यंत्रणेला काही देणे घेणे नसल्याचे यावेळी स्पष्ट दिसुन आले. विशेष म्हणजे सायंकाळी ६ वाजता त्या रुग्णाचा रिपोर्ट पाझिटीव्ह आल्यानंतरही रुग्णांना त्या वार्डात भर्ती करणे सुरुच होते. तसेच या रुग्णालयाच्या परिसरात डाँक्टरांची सर्व यंत्रणा असुनसुद्धा त्या रुग्णाला वार्डातुन आयसोलेशन वार्डात नेण्याकरिता तब्बल ४ तास लागले. यावरुन येथिल यंत्रणा किती सक्षम आहेत, या घटनेवरुन समोर आलेत.मात्र यादरम्यान रुग्नांसह नातेवाईकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली होती.

वार्ड सानिटायझर सकाळी करु

कोरोना रुग्न वार्डातुन नेल्यानंतर नातेवाईकांनी उपस्थित डाँक्टरांना वार्ड सानिटाईझर करण्याबाबत विचारना केली असता,आमच्याकडे कर्मचारी उपलब्द नसल्यामुळे उद्या सकाळी सानिटाईझर केल्या जाईल.तोपर्यंत आपआपल्या तोंडाला मास्क बांधुन ठेवा असे सांगण्यात आले.