Home सामाजिक  एक गाव एक गणपती संकल्पना आजही संकल्पातच ! कोरोना संकटातही गणेशभक्तांची...

एक गाव एक गणपती संकल्पना आजही संकल्पातच ! कोरोना संकटातही गणेशभक्तांची संकल्पनेला पाठ..

191

 

गुडाळ / प्रतिनिधी -उदय कांबळे

गणेशोत्सव काळात हवा , पाणी तसेच ध्वनी प्रदूषण मोठया प्रमाणात होत असून या प्रदूषणाचा मानवी जीवनावर दुष्परिणाम होत असल्याने याची गंभीर दखल घेत शासनस्तरावर एक गाव एक गणपती संकल्पना निर्माण झाली . या संकल्पनेला बरीच वर्षे उलटली . सदर संकल्पना अंमलात येण्यासाठी सर्व स्तरातून जनजागृती करण्यात आली . मात्र दैव भीतीपोटी ही संकल्पना आजही संकल्पातच राहिली आहे . कोरोना संकटाच्या पाश्र्वभूमिवर या संकल्पनेच स्वागत होने गरजचे असताना तसे झाले नाही .
गणेशोत्सव म्हणजे प्रत्येकाच्या आनंदाला उधाण ! घरगुती गणपतीसह सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याची प्रथा गेल्या काही वर्षापासून वाढली आहे . शहरांपासून ग्रामीण भागापर्यंत सार्वजनिक मंडळांची संख्या वर्षानुवर्ष वाढत आहे . त्याच पटीत मुर्तींची संख्या वाढली आहे .परिणामी सदर मुर्तींचे विसर्जन नदी -विहीर तसेच सार्वजनिक पाणठ्यावर होत असल्याने पाणी प्रदूषणाला तोंड द्यावे लागते आहे . पाणी जीवन आहे ;तर नदी जीवनवाहिणी आहे . त्यामुळे नदीचे प्रदूषण टाळण्यासाठी आणी घरगुती व सार्वजनिक गणेश मुर्तींचे संख्या कमी करण्याच्या उद्देशाने एक गाव एक गणपती संकल्पना निर्माण झाली .
सदर संकल्पना गावोगावी राबवावी याकरीता सामाजिक , शैक्षणिक तसेच शासनस्तरावरून पोवाडे , किर्तन , प्रबोधन याद्वारे जनजागृती करण्यात आली . संकल्पनेच्या अंमलबजावणीसाठी सर्वच स्तरातून खुप प्रयत्न झाले . मात्र वर्षानुवर्ष- पिढ्या नि पिढ्या चालत आलेल्या घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सव प्रथेला बगल देणे हे दैव् भीतीपोटी शक्य झाले नाही . त्यामुळे एक गाव एक गणपती संकल्पना आजही संकल्पातच राहिली .
दरम्यान संपुर्ण जग कोरोनाच्या संकटात सापडले आहे .कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी देशभर लॉकडावून करण्यात आले . मात्र त्याला फारस यश आले नाही . दिवसेंदिवस कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादूर्भाव वाढतच आहे . किमान कोरोना महामारीच्या पाश्र्वभूमिवर सुरक्षिततेच्या दृष्टिने एक गाव एक गणपती ही संकल्पना सर्वत्र गावोगावी राबवणे आवश्यक होते . मात्र तसे झाले नाही . कोरोना विषाणू संकटातही गणेश भक्तांनी एक गाव एक गणपती संकल्पनेकडे पाठ फिरवली आहे .

Previous articleस्‍वच्‍छ सर्व्‍हेक्षण 2020 मध्‍ये मुल नगर परिषद देशात 12 व्‍या क्रमांकावर मुल नगर परिषदेला 5 कोटी रू. चे पारितोषीक मिळणार हे यश मुल शहरातील नागरिकांचे – आ. सुधीर मुनगंटीवार
Next articleरिपब्लिकन आठवले पक्षाचे कोकण प्रदेशाध्यक्ष पदासाठी सुशांत भाई सकपाळ यांच्या नावाची चर्चा