माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील साहेब यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला . 

 

इंदापूर तालुका प्रतिनिधी:

 बाळासाहेब सुतार :दि.21

राज्याचे माजी सहकार मंत्री व भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांचा 57 वा वाढदिवस इंदापूर तालुक्यामध्ये विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. आज शुक्रवारी वाढदिवसानिमित्त गावागावांमध्ये वृक्षारोपण व रोपांचे वाटप,विविध स्पर्धा, केकचे वाटप आदी कार्यक्रम आनंदी व उत्साही वातावरणात संपन्न झाले.

बावडा गावातील रत्नप्रभादेवीनगर येथे ग्रामपंचायतीच्या वतीने आंब्याच्या रोपांचे वृक्षारोपन करण्यात आले. तसेच यावेळी नागरिकांना रोपांचेही वाटप करण्यात आले. याप्रसंगी निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक उदयसिंह पाटील, मयुरसिंह पाटील, महादेव घाडगे, सरपंच किरण पाटील, उपसरपंच निलेश घोगरे, पवनराजे घोगरे, शिवाजीराव पवार, सचिन सावंत, दिलीप नायकुडे, नवनाथ पवार आदी उपस्थित होते. तत्पूर्वी सकाळी बावडा येथे हर्षवर्धन पाटील यांच्या रत्नाई या निवासस्थानी गावाच्या  ग्रामस्थांनी वाढदिवसानिमित्त केक कापून आपल्या साहेबांना शुभेच्छा व्यक्त केल्या. यावेळी गावातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.आज हर्षवर्धन पाटील हे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होऊन, तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून मतदारसंघांमध्ये नव्हते.

तसेच शहाजीनगर येथील निरा भिमा सहकारी साखर कारखान्यावरती वाढदिवसानिमित्त प्रभारी कार्यकारी संचालक सुधीर गेंगे पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी अधिकारी व कर्मचारी यांनी केक कापून उत्साहात व आनंदी वातावरणात वाढदिवस साजरा केला.

_______________________________

फोटो.

Balasaheb Sutar
Reporter
Mob.9850628160