“रिक्त पदामुळे झरीच्या विकासाला ग्रहण ” : – सभापती राजेश्वर गोंड्रावार आदिवासी बहुल विभागाचा मानव विकास करण्यास उदासीनता का?” मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.यवतमाळ यांना निवेदन

 

 

प्रतिनिधी:रोहन आदेवार

यवतमाळ: जिल्ह्यात झरी तालुक्याची आदीवासी बहुल तालुका म्हणुन ओळख असतांना सुद्धा तो राज्याच्या पठलावर गाजलेला तालुका असताना झरी तालुक्यातील रिक्त पदे न भरणे म्हणजे मानव विकास साध्यकरणे होय काय? असा प्रश्न घरी पंचायत समितीचे सभापती राजेश्वर गोंड्रावार यांनी दिलेल्या निवेदनातून केला आहे.

झरीजामणी या पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या शिक्षण, आरोग्य, पशुसंवर्धन, अंगणवाडी, कृषी, या सह इतर अनेक विभागाचे कर्तव्य तत्पर कार्याचे पदे रिक्त असून त्यात बदली प्रकरण असतांना शासनाने पद संख्या लक्षात घेता त्या भरणा करणे गरजेचे असताना, काही प्रमाणात कर्मचार्यांचा कामावर विकास कामाचा कांगावा केला व काम चालून घेतले हे जरी सत्य असले तरी आज अनेक प्रशासनाची रिक्त पदे असल्यामुळे झरी जामणी तालुक्याच्या विकास कामाला ब्रेक लागत आहे, वणी व पांढरकवड्यावरून अपडाऊन कर्मचारी करत असल्यामुळे त्यांची माणसिकता पण कामावर लागत नाही म्हणुन 100 टक्के रिक्त पदाचा भरणा होणार नाही तर आदिवासी समाजाचा मानव विकास साध्य करता येतील काय? असा सवाल राजेश्वर गोंड्रावार यांनी केला. या आधी आळावा सभा घेऊन रिक्त पदाची पहिले भरती पूर्ण करा, नंतरच इथले कर्मचाऱ्यांची बदली करा असे सभेत सांगितले गेले पण प्रशासनाने ह्याकडे गांभीर्यांने घेतले नसल्यामुळे हे आता मी खपवून घेणार नाही तसेच झरीजामणी तालुका हा आदिवासी बहुल तालुका असल्यामुळे येथे अॅन्टीकरप्शन मधे व भ्रष्टाचारा मधे सापडलेले अधिकारी देऊ नका दिल्यास मी त्यांना रुजु करुन घेणार नाही असा पण त्यांनी भर सभेत तंबी त्यांना दिली .