अचलपूर ग्रामिण भागात 71 कोरोनाबाधित 4 मृत्यू,28 सक्रिय, काकडा बाधिकांच्या संपर्कातील नाट्यमय घडामोडीनंतर पोलीस हस्तक्षेपात विलगिकरणात दाखल

अमरावती(उपजिल्हा प्रतिनिधी, युवराज डोंगरे)
जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यात ग्रामिण भागातील तीन प्राथमिक आरोग्य केंद्रात एकूण 71 कोरोनाबाधित संख्या असून त्यापैकी 28 जण सक्रिय बाधित आहेत
पथ्रोट पाथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत उपकेंद्र परसापूर मधील टवलारच्या 27 वर्षीय पुरुषाचा अकोला येथे उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने एकूण स्थानिक आरोग्य केंद्राअंतर्गत 3 कोरोनाचे बळी असून अचलपूर तालुक्यातील ग्रामिण भागातील बळी गेलेल्यांची संख्या 4 झाली आहे टवलारचा रुग्ण न्यूमोनियाग्रस्त असल्याची माहिती आहे त्याच्या अतिसंपर्कातील 7 रुग्ण असून त्यांना परतवाडा येथील कल्याणमंडपम विलगिकरण केंद्रात पाठविले आहे याच गावाला लागून असलेल्या खांजमानगर येथील पुरुष अचलपूर येथील बुंदेलपुऱ्यातील कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याने त्याचा अहवाल हा सकारात्मक आला आहे
काकडा येथील 60 वर्षीय महिला आजाराने त्रस्त असता अँटीजन तपासणीत त्या महिलेचा अहवाल सकारात्मक आला आहे तिच्या संपर्कातील 7 जणांनी संस्था विलगिकरणात नकार देत वैद्यकीय अधिकाऱ्यांशी हुज्जत घातली महिला असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पोलीस सहकार्य घेत त्यांना परतवाडा विलगिकरण केंद्रात दाखल केले
पथ्रोट आरोग्य केंद्रात 16 कोरोनाबाधित झाले असता 5 सक्रिय रुग्ण असून स्थानिक गावातील रुग्णसंख्या 11 झाली आहे परसापूर टवलारसह पथ्रोटच्या 9 वर्षीय बालकाचा समावेश आहे
4 था मृत्यू हा धामणगाव गढी आरोग्य केंद्रातील समाविष्ट आहे टवलार येथे आरोग्य सेवक निलेश दुर्बुडे, आरोग्य सेविका तनुजा धिकार, आशा स्वयंसेविका सौ पधरे, च-हाटे यांनी अतिसंपर्कात आलेल्यांना विलगिकरणात पाठविले तर 15 सामान्य संपर्कात आलेल्याची तपासणी करुन गृहविलगिकरणात ठेवले असून प्रशासनाकडून बधितांचे निवास परिसर प्रतिबंधित केला असून निर्जंतुक केला आहे फवारणी करण्यात आली आहे