Home कोरोना  गडचिरोली जिल्हयात 15 कोरोनामुक्त तर नवीन 6 बाधित

गडचिरोली जिल्हयात 15 कोरोनामुक्त तर नवीन 6 बाधित

160

 

गडचिरोली (जिमाक) दि.21 ऑगस्ट: जिल्हयातील एकूण सक्रिय कोरोना बाधितांपैकी 15 जण आज कोरोनामुक्त झाले. यामध्ये गडचिरोली येथील 6 स्थानिक, अहेरी येथील 5 स्थानिक, भामरागड येथील 1, वडसा येथील 2 स्थानिक, धानोरा 1 व कोरचीतील 1 जणांचा समावेश आहे. या प्रकारे 15 जण आज कोरोनामुक्त झाले आहेत.
*नव्याने आज 6 बाधित* : नवीन 6 बाधितांमध्ये धानोरा येथील 1, चामोर्शी तालुक्यातील एकूण 4, यामध्ये यवतमाळ प्रवाशी 2, रूग्णालयातील भरती 1 रूग्ण व 1 जण तेलंगणावरून आलेला बाधित मिळाले. तर 1 जण ग्यारापत्ती येथील रूग्णाच्या संपर्कातील पोलीस जवान कोरोना बाधित आढळून आला.

यामूळे जिल्हयातील सक्रिय कोरोना बाधितांची आकडेवारी 116 झाली तर आत्तापर्यंत 755 जणांनी यशस्वीरीत्या कोरोनावर मात केली आहे. तसेच जिल्हयातील एकूण कोरोनाची बाधा झालेल्या लोकांची संख्या 872 झाली.

Previous articleअसभ्य वागणुक देणाऱ्या ग्रामसेवकावर तात्काळ कारवाई करा प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे बीडीओ सह तहसीलदार यांना निवेदन
Next articleअचलपूर ग्रामिण भागात 71 कोरोनाबाधित 4 मृत्यू,28 सक्रिय, काकडा बाधिकांच्या संपर्कातील नाट्यमय घडामोडीनंतर पोलीस हस्तक्षेपात विलगिकरणात दाखल