संततधार पावसामुळे नदीला आला पूर अनेक शेतकऱ्यांची शेती पुराच्या पाण्याखाली पुरामुळे रस्ते वाहतूक काही काळासाठी ठप्प वादळ वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडली वाहतूक ठप्प

0
171

 

अश्विन बोदेले /दिनेश बनकर
प्रतिनिधी दखल न्यूज भारत

कोजबी/ वैरागड :- काल सायंकाळी झालेल्या संततधार पावसामुळे वैरागड नजीकच्या खोब्रागडी नदी पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे वाहतुकीस अडचण निर्माण झालेली आहे . व वाहतूक काही काळासाठी ठप्प झालेली आहे. गेल्या दोन तीन दिवसापासून होत आलेल्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. व याच संततधार पावसामुळे वैरागड नजीकच्या नदी पुलावर पाणी वाहत आहे. व त्यामुळे वाहतूक ठप्प झालेली आहे. परिणामी नदीला पूर आल्यामुळे अनेक शेतकऱ्यांची शेती पुराच्या पाण्याखाली गेल्यामुळे धान पीक धोक्यात आलेले आहे . व जिकडे तिकडे पाणीच पाणी असे चित्र पहावयास मिळत आहे.
तसेच काल सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे कोजबी लोहारा मार्गावर काही झाडे उन्मळून पडल्यामुळे कोजबी लोहारा मार्ग बंद पडला आहे. तात्पुरती पर्यायी व्यवस्था म्हणून आवागमन करण्यासाठी झाडाच्या फांद्या छाटून लोक ये-जा करीत आहेत. परंतु संबंधित विभागाने याकडे अजूनही लक्ष दिलेले नाही. तरी संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन कोजबी लोहारा मार्गावरील झाडे लवकरात लवकर हटवून वाहतूक व्यवस्था सुरळीत करावी अशी जनमानसातून मागणी होत आहे. पावसाळ्याच्या दिवसात रस्ते मार्ग वाहतूक ठप्प असेल तरअनेक अडचणी निर्माण होत असतात. त्यामुळे या अडचणी लक्षात घेऊन संबंधित विभागाने तात्काळ पर्यायी व्यवस्था करून देण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केलेली आहे.