जिल्ह्यात अतीवृष्टीमुळे वाहतूक सेवा खोळंबली अनेक गावांचा संपर्क तुटला

0
181

 

तालुका प्रतिनिधी-ऋग्वेद येवले
उपजिल्हा प्रतिनिधी-निलय झोडे

साकोली-जिल्ह्यात मागील २४ तासांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे लहान नद्या व नाले ओसंडून वाहत आहेत.साकोली तालुक्यातील चुलबंद नदीवरील कमी उंचीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक सेवा खोळंबली आहे.तसेच बोदरा येथील मामा तलावाची पार फुटल्याने पाणी साकोली-नागपुर महामार्गावर आल्याने वाहतूक सेवा बंद करण्यात आली आहे.
तसेच शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले मालगुजारी तलाव पुर्णपणे भरल्याने शहर जलमय झाले व भंडारा, लाखांदूर, तुमसर,तिरोडा, नागझिरा,लवारी, उमरी ईत्यादी गावांचा संपर्क तुटला असुन शेतकऱ्यांचे धानपिकाचे खूप नुकसान झाले आहे.