महादुला कन्हैया ले आऊट मध्ये आज एक जण कोरोना पाँजिटीव

0
619

 

सुनील उत्तमराव साळवे
(९६३७६६१३७८)
कार्यकारी संपादक, दखल न्यूज भारत नागपुर

महादुला-कोराडी / नागपुर : २१ आँगस्ट २०२०
नागपुर जिल्ह्यातील कामठी तालुक्यात असलेल्या महादुला नगरपंचायत हद्दीतील कन्हैया ले आऊट मध्ये आज एक कोरोना पाँजिटीव पेशंट मिळाला आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार ३२ वर्षिय या युवकाची रैपिड टेस्ट केली असता दोन तासात त्याचा रिपोर्ट हा पाँजिटीव आला आहे. या व्यक्तीच्या घरातील व घर मालकाच्या कुटुंबातील एकुण ४-५ जणांची उद्या टेस्ट केली जाईल. सध्या या व्यक्तीस कोव्हीड सेंटरला हलविण्याची प्रक्रिया सुरू आहे अशी डाँ. राऊत व महादुला नगरपंचायत कर्मचारी यांनी माहिती दिली. हा व्यक्ती राहत असलेल्या घरी सेनिटायजर फवारणी केली आहे. आणि क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे.