चंद्रपूर शहरात अपघात टाळण्याकरीता मोकाट जनावरांवर नियंत्रण आणा आपची मागणी…

0
127

 

प्रितम देवाजी जनबंधु
कार्यकारी संपादक

चंद्रपूर शहरात मुख्य रस्त्यावर बिगर मालकीची आणि मालकीचे तथा बेवारस जनावर यांच्या मुळे होणाऱ्या अपघातात भर पडत आहे. आणि बहुतांशपणे रात्रीच्या सुमारास जनावरे मोकाट राजरोषपणे मुख्य रस्त्यावर बसून असतात. त्यामुळे सदर जनावरे वाहनाच्या संपर्कात येऊन अपघात होण्याची भीती निर्माण झालेली आहे. करीता जनावरांच्या मालकांवर दण्डात्मक कार्यवाही करावी. अशी रास्त मागणी आप च्या पदाधिकारी यांनी केली आहे.

 

सदर मोकाट जनावरांवर नियंत्रण आणण्याकरिता आज दिनांक 21 आगस्ट 2020 रोजी श्री. सिकंदर सागोरे (कोषाध्यक्ष), श्री. राजेश चेडगूलवार (आप चंद्रपूर जिल्हा, महानगर सोशल मीडिया प्रमुख) यांच्या नेतृत्व खाली झोन क्र. 1 येथे मा. उपायुक्त मॅडम यांना निवेदन देण्यात आले यावेळी श्री. प्रशांत येरने (चंद्रपूर महानगर संघटन मंत्री), श्री. अजय डुकरे (सहसचिव), श्री. दिलीप तेलंग, श्री. योगेश तोडे, श्री. वसंत वाघमारे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.