धारदार चाकूने जिवे मारण्याचा प्रयत्न बेलतरोडीत घडली थरारक घटना

339

 

आशिष भगवान थूल
(९८३४७१८२६८)
प्रतिनिधी
दखल न्यूज भारत नागपूर

नागपूर :- २१ आॅगष्ट २०२०
शहराच्या बेलतरोडी ठाणे परिसरातील कुख्यात अपराध्याने जुन्या वैमनस्यातून आपल्या प्रतिद्वंदिवर जीवघेणा हल्ला केला. बुधवारच्या रोजी मध्यरात्री घडलेल्या या घटनेने नागरिकांमध्ये कमालीची दहशत पसरली आहे.
या घटनेचे सविस्तर वृत्त असे की, घटनेचा मूख्य सूत्रधार विजय घोडके (वय ३६),रा.राहूल सोसायटी व त्याचा साथिदार कुणाल पंचभूते (वय २५),रा. राकेश ले-आउट हे आहेत व त्यांचा अन्य साथिदार संजय कूमार प्रसाद (वय५०) हा फरार आहे.घटनेत गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव वसीम सैय्यद उमर (वय३९) रा.मनिष नगर असे आहे.आरोपी विजय ने २०१२ मध्ये कामठी परिसरात एका युवकाची हत्त्या केली होती. गेल्या काही दिवसांपासून त्याची सैय्यद वसीम सोबत कुणकुण सुरू होती. वसीम हाही सराईत गूंड आहे. वसीम हा आपल्या विरोधात लोकांना भडकवण्याचे काम करत आहे अशी शंका विजय ला होती. विजय हा बर्याच दिवसांपासून वसीम चा काटा काढण्याच्या बेतात होता. बूधवारच्या मध्यरात्री त्याला ही संधी भेटताच त्याने आपल्या साथीदारांच्या मदतिने वसीम ला गाठले. त्याला शिविगाळ करून “साले आज तेरा गेम हि बजा डालता हू”अशी धमकी देत मारपिट करायला सुरुवात केली. विजय च्या साथिदारांनी वसिम ला पकडून ठेवले असतानाच आरोपि विजय ने धारदार चाकूने वसीम चर्या गळ्यावर सपासप वार करून गंभीर जखमी केले आणि तेथून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच बेलतरोडी पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला आणि त्यांनी लगेच जखमी वसीम ला उपचारासाठी रुग्णालयात भरती केले.घटनेचा पंचनामा करून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.या घटनेवरून गूंडांमध्ये पोलिसांचे भय नसल्याचे दिसतं येते.पोलिस विभागाने याची गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे.