लोनवाही (सिंदेवाही) त आढळला कोरोना पॉझिटिव्ह. जनतेने घाबरून न जान्याचे ग्रामपंचायत प्रशासनाने केले आवाहन.

587

(चंद्रपूर जिल्हा)
भगवंत पोपटे,
नागपूर विभागीय प्रतिनिधी,
दखल न्युज व दखल न्युज भारत.

मागिल दिवसात सिंदेवाही शहरातील जैस्वाल कॉलनीतील एक कुटुंब नागपूर येथे लग्न समारंभ आटोपून परत आल्यावर ते संपूर्ण कुटुंबच पॉझिटिव्ह निघाल्याने सिंदेवाही शहरात एकच खळबळ उडाली होती. सध्या सिंदेवाही शहरातील जनतेने सुटकेचा निःश्वास टाकला होता. तोच नजिकच्या लोनवाही ग्रामपंचायत हद्दीतील वार्ड क्र. २ मधील एक तरुण, मुल येथील पंचायत समिती चे एम.आर. इ. जि. एस. विभागात कंत्राटी कामगार म्हणून काम करीत होता. तो आज दिनांक- २१/८/२०२० रोजी कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने त्याचेसोबत त्याचे संपूर्ण कुटुंबाला सिंदेवाही येथील क्वॉरंटाईन सेंटरला क्वॉरंटाईन केले असल्याने, लोनवाहीत आणि सिंदेवाही शहरात एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णाच्या घराशेजारील एरिया व शेजारील रस्ता ग्रामपंचायत प्रशासनाकडून दुपारी ३-०० वाजता सिल करण्यात आला असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. जनतेनी घाबरून न जाता स्वत:ची काळजी स्वत: घ्यावी व ग्रामपंचायत प्रशासनाला सहकार्य करावे, असे भावनिक आवाहन ग्रामपंचायत प्रशासनातर्फे सरपंच श्री. गणेश गोलपल्लीवार यांनी केले आहे. तसेच उद्याला परिसरातील जनतेची कोविद-१९ ची तपासणी कोविद सेंटर ला करायची असल्याबाबत ग्रामविकास अधिकारी- मिनाक्षी बंसोड यांनी भ्रमणध्वनीवरून सांगितले आहे.
ग्रामपंचायत, लोनवाही प्रशासनाने केलेल्या आवाहनाला जनतेने प्रतिसाद देत घाबरून न जाता आपल्या सर्वांना मिळून कोरोनाचा भागाकारच करायचा आहे. त्यासाठी जनतेने ग्रामपंचायत प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
———————-
स्वस्थ राहा, सुखी राहा, घराबाहेर पडू नका, आपल्या सहकार्याने कोरोनाचा भागाकारच होईल हे नक्की. धन्यवाद !