Home रत्नागिरी श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, चिपळूणचा गणेशोत्सव यंदा दिड दिवसाचा

श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, चिपळूणचा गणेशोत्सव यंदा दिड दिवसाचा

165

 

प्रतिनिधी / ओंकार रेळेकर.

चिपळूण : यंदा श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, चिपळूण या मंडळाचा गणेशोत्सव शनिवार, दि.२२ ऑगस्ट २०२० व २३ ऑगस्ट २०२० ह्या दिवशी दिड दिवस माधव सभागृह, चिपळूण येथे साजरा करण्यात येणार आहे. गणेशमुर्ती दिड फुटाची व शाडूच्या मातीची आहे. आज गुरुवार दि. २० ऑगस्ट २०२० रोजी गणेशमुर्तीचे खाजगी चारचाकी वाहनाने अत्यंत साध्या पद्धतीने लवेकर बंधू गणपती कारखाना, कापसाळ येथून आगमन होऊन माधव सभागृह, चिपळूण येथे स्थानापन्न झाला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ पाटणकर, कार्याध्यक्ष रमण डांगे, सचिव नित्यानंद भागवत, उपाध्यक्ष रमेश चिपळूणकर गुरुजी व सुनिल कुलकर्णी, सदस्य साहिल चौघुले, अमेय डांगे, पंकज शेट्ये हे मोजकेच पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते. शनिवार दि. २२ ऑगस्ट २०२० रोजी दुपारी १२ वाजता प्रतिष्ठापना व रात्रौ ८ वाजता आरती व रविवार दि. २३ ऑगस्ट २०२० रोजी सकाळी ८ वाजता पुजा-आरती व दुपारी ३ वाजता उत्तरपुजा होऊन संध्याकाळी ६ वाजता माधव सभागृह येथेच छोट्या कृत्रिम हौदात विसर्जन करण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त कोणतेही धार्मिक, सांस्कृतिक व स्पर्धा कार्यक्रम संपन्न होणार नाही आहेत. गणेशोत्सवाच्या ठिकाणी सॅनिटाइजर व सुरक्षित अंतर पाळून दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. यंदा लाऊडस्पिकरचा वापर देखील करण्यात येणार नाही.

*दखल न्यूज भारत*

Previous articleनियमन मुक्ती चा आदेश मागे घ्यावा   कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत समाविष्ट करावे  या मागणीसाठी बाजार समिती कर्मचाऱ्यांचे आंदोलन
Next articleजि.प.स.सभापती ऋतुजा जाधव यांची आकले गावाला भेट. जाणून घेतल्या नागरिकांच्या समस्या.