अकोट बस आगरातूनही बस सुटली

 

अकोट शहर प्रतिनिधी
स्वप्नील सरकटे

गेल्या पाच महिण्यापासून एस.टी.प्रवाशी बस सेवा बंद होती. परंतु दि.२० आॅगस्ट पासुन संपूर्ण महाराष्ट्रात एस.टी. बससेवा चालू झाली आहे .अकोट आगारातून सुध्दा बस सेवा सुरू झाली.एका बाकावर एक प्रवाशी प्रवास करती तसेच प्रवाश्यांना प्रवासासाठी ई- पासची आवश्यकता नाही .परंतु खाजगी बसने प्रवास केल्यास ई_पास बंधनकारक आहे. प्रवाशांना मास्क बंधनकारक राहिल मास्क नसल्यास रूमाल नाका तोंडाला बांधणे बंधनकारक असेल.प्रवाशांना तालुक्यातून,जिल्हातून, व महाराष्ट्रातून सर्व ठिकाणी प्रवास करता येईल.सर्व प्रकारचे प्रवासी,ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, या सर्व प्रवाशांना प्रवास करता येईल. कुठलीही भाडेवाढ न करता प्रवास करता येईल.एस .टी.प्रवाशी सेवा फक्त महाराष्ट्रात पुरती मर्यादित असून महाराष्ट्रात बाहेर इतर राज्य प्रवासासाठी परवानगी नाही .