स्व.राजीवजी गांधी यांच्या जयंती निमित्त चिखली काॅग्रेस कडुन अभिवादन

147

 

चिखली: विशेष प्रतिनिधी मनोज बागडे
आज जगात सुपर पाॅवर म्हणुन ओळखल्या जाणा-या भारतात संगणक आणि दुरसंचार क्षेत्रात क्रांती घडवुन आणणारे व त्याचबरोबर तरूण मतदारांना लोकशाही प्रक्रीयेत सहभागाची संधी वयाच्या 18 व्या वर्षी उपलब्ध करून देणारे भारताच्या इतिहासातील सर्वात तरूण पंतप्रधान पदाचा मान मिळविणारे माजी पंतप्रधान भारतरत्न स्व.राजीवजी गांधी यांची जयंती चिखली तालुका काॅग्रेस कमिटीच्या वतीने काॅग्रेसच्या जनसेवा कार्यालयात साजरी करण्यात आली. जयंती निमित्त काॅग्रेसच्या जनसेवा कार्यालयात आयोजित कार्यक्रमात भारतरत्न स्व.राजीवजी गांधी यांना पुष्पाजंली वाहुन अभिवादन करण्यात आले.
दिनांक 20 आॅगस्ट 2020 रोजी काॅग्रेस जनसेवा कार्यालयात भारतरत्न स्व.राजीवजी गांधी यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. चिखली तालुका काॅग्रेस कमिटीचे अध्यक्ष विष्णु पाटील कुंळसुदंर, बाजार समितीचे सभापती ज्ञानेेश्वर सुरूशे, युवक काॅग्रेसचे राम डहाके यांच्यासह मोठया संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.