तिरोडा – तुमसर मार्ग बंदने यातायात ठप्प तालुक्यात पूर जन्य परिस्थिती

242

 

प्रतिनिधी/अतित डोंगरे

तिरोडा : कोविडचे थैमान असल्याने बस सेवा पूर्णतः बंद करण्यात आले होते. केवळ जिल्ह्या अंतर्गत सेवा सुरू होत्या. २० आगष्ट पासून राज्यातंर्गत सेवा सुरू झाल्यात. त्याच दिवशी पावसाने मारलेली दडी खुली केली. त्याचे रूपांतर आता तालुक्यात पुरजन्य परिस्थती अशी निर्माण झालेली आहे. धादरी पूलावर पाणी असल्याने या गावाचा सम्पर्क इतर गावांशी तुटलेला आहे.
राज्य मार्ग २४९ चे रुंदीकरणाचे सिमेंट रस्ता बांधकाम मागील वर्षांपासून सुरू आहे. बिर्सी पुलिया, इसार पेट्रोल पंप जवळ पुलिया बांधकाम सुरू आहे. आवागमनासाठी बाजूने कच्चा रस्ता तयार करण्यात आलेला आहे. पावसाचे पाण्याने तोच फुटल्याने यातायात बंद झाली असल्याने आता बारब्रिकस रस्ता निर्माण कँपनी नागरिकांचे असमाधानाचे कारण बनत चालले आहे. सिमेंट रस्ता व पुलियाचे बांधकाम अतिशय संथ गतीने सुरू असल्याने याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे अनेक गावातील नागरिकांना जबर फटका बसतो आहे.
अदानी वीज निर्माण कारखाना असल्याने तालुक्यातील अनेक मजदूर येथे कामाला आहेत. कोविड प्रादुर्भाव सोसावे लागतच आहे. ते सुरूच असतांना आता कच्चा रस्ता फुटल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर लागले असल्याने असंतोषाचे वातावरण निर्माण होत आहे.
तात्काळ रस्त्याचे डागडुजी करण्याचे मागणी मजदूर व जनतेने केले आहे.