सडगांव जिल्हा परिषद मराठी शाळेत तांदूळ वाटप

0
125

 

राजू हालोर
उपसंपादक खान्देश विभागीय

धुळे तालुक्यातील सडगांव येथील जिल्हापरिषद मराठी शाळेत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शाळा बऱ्याच दिवसापासून बंद आहेत. आणि पुढेही बंद राहणार आहेत. या काळात विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार म्हणून दिले जाणारे अन्न धान्य शिल्लकच राहिले आहे. त्याचे तीन महिण्याचे वाटप सडगांव जिल्हा परिषदेच्या शाळांमधून विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्याना गुरुवारी तांदूळ आणि डाळीचे वाटप करण्यात आले. प्राथमिक मराठी शाळेत दोनशे एकेच्याळीस विद्यार्थ्यांना तांदूळ,मुगडाळ, मोहरी, जिरे, तेल आणि हरभऱ्याचे वाटप सडगांव गांवातील सामाजिक कार्यकर्ता सोपान पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. अशी माहिती अनुक्रमे मुख्यध्यापक कमला बैसाणे मॅडम यानी दिली आहे.
शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गंगाबाई पदमर यांनी सांगितले आहे.
दरम्यान प्राथमिक जिल्हा परिषद शाळेतील विदयार्थाना पोषण आहार वाटप करण्यात आले