रत्नागिरीतील शहरातील अपेक्स हॉस्पिटल जिल्ह्यातील पहिलं खाजगी कोव्हीड रूग्णालय

 

प्रतिनिधी निलेश आखाडे.

रत्नागिरी – रत्नागिरी शहरानजीक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) शेजारी नाचणे रोड लगत येथे असलेल्या नवीन अद्यावत अपेक्स हॉस्पिटल आज पासून रत्नागिरीकरांच्या सेवेसाठी सज्ज झालं आहे. या हॉस्पिटलचा शुभारंभ श्री.वसंत मुळ्ये यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी हॉस्पिटलची पाहणी करून डॉ.मुळ्ये कुटूंबियांना शुभेच्छा दिल्या. यावेळी हॉस्पिटलच्या संचालिका डॉक्टर मीरा मुळ्ये यांनी सामाजिक जबाबदारी ओळखून आम्ही हा निर्णय घेतला असून या हॉस्पिटल मध्ये 12 आयसीयू बेड आणि 22 जनरल बेडची व्यवस्था केली आहे. तसेच येथे अत्याधुनिक मशीनद्वारे निमोनियाचे अचूक निदान व एक मिनिटात सिटीस्कॅन होईल. त्याच प्रमाणे जिल्ह्यातील पहिली डीआर एक्स-रे सिस्टीम या हॉस्पिटलमध्ये आहे. आठ अद्यावत व्हेंटिलेटरची सोय आहे. तसेच येथे 24 तास, फिजिशियन, सर्जन, रेडिओलॉजिस्ट उपलब्ध राहणार आहे असे त्यांनी सांगितलं.
या ग्रुपचे हे तिसरे हॉस्पिटल असून पेशंटला सर्वोत्तम व गुणवत्तापूर्वक सेवा मिळण्याची खात्री आम्ही देत आहोत असे डॉ. सुशीलकुमार मुळ्ये यांनी सांगितलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील पाहिले खाजगी कोरोना रुग्णालय झाल्याने नागरीकही समाधान व्यक्त करीत आहेत. यावेळी अरिहंत कन्स्ट्रक्शनचे महेश गुंदेजा.राजू भाटलेकर.डॉ. देशमुख आदी हितचिंतक, मित्र परिवार उपस्थित होते. नव्याने सुरू झालेल्या या रुग्णालयास सर्वांनी शुभेच्छा दिल्या.

*दखल न्यूज भारत*