Home रत्नागिरी कोरोना लढा सन्मान स्पर्धेतील मानांकनासाठी निवळी ग्रामपंचायतीचा फेरविचार होणे गरजेचे

कोरोना लढा सन्मान स्पर्धेतील मानांकनासाठी निवळी ग्रामपंचायतीचा फेरविचार होणे गरजेचे

164

 

प्रतिनिधी निलेश आखाडे.

रत्नागिरी : कोविड १९ साठी प्रशासनाने जाहीर केलेल्या कोरोना लढा सन्मान स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील बहुसंख्य ग्रामपंचायतींनी सहभाग घेतला होता.सर्वच ग्रामपंचायतींनी प्रशासनाने दिलेल्या अटीशर्तींचे पालन केले.रत्नागिरी तालुक्यातील निवळी ग्रामपंचायतीने देखील मनापासून या स्पर्धेत उत्तम सेवा बजावली.ग्रामपंचायतच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम, अत्यावश्यक सेवांची व्यवस्था, चाकरमान्यांची नियोजित व्यवस्था करण्यात आली होती.चाकरमान्यांनी देखील सर्व ग्रामपंचायत कमिटी व गावकऱ्यांचे कौतूक केले आहे.परीक्षण कमिटीने देखील निवळी ग्रामपंचायतीच्या कोरोना काळातील कामाचा अहवाल पाहिल्यानंतर समाधान व्यक्त केले होते.त्यामुळे आपले गुण कसे कमी झाले,ज्यामुळे आपल्या ग्रामपंचायतीचा नंबर यादीतून मागे राहिला.असा ग्रामस्थांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.त्यांच्यातील हा गैरसमज प्रशासनाने दूर करावा त्यामुळे ते पुढील स्पर्धेत उमिदीने भाग घेतील.नाहीतर नाराज होऊन दुखावतील.गावकऱ्यांचे धेर्य, मनोबल वाढवण्यासाठी आम्ही आदर्श गाव सेवा संघ त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक करून केलेल्या मागणीसाठी पाठींबा दर्शवत आहोत.त्यांच्या मागणीचा फेरविचार होणे गरजेचे आहे अशा आशयाचे निवेदन आदर्श गाव निर्माण सेवा संघाचे संस्थापकीय अध्यक्ष श्री रघुनंदन भडेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केले आहे.

*दखल न्यूज भारत*

Previous articleआ. शेखर निकम यांच्यासह चिपळूण काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या लढ्याला यश
Next articleगणपती विसर्जनासाठी रनपकडून विशेष नियोजन; आठ ठिकाणी असणार कृत्रिम तलाव