आ. शेखर निकम यांच्यासह चिपळूण काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या लढ्याला यश

121

 

प्रतिनिधी / ओंकार रेळेकर.

चिपळूण (प्रतिनिधी): रत्नागिरी जिल्ह्यात हातपाटी वाळू परवाने मिळावेत व ब्रासचे दर कमी व्हावे, यासाठी आमदार शेखर निकम यांच्यासह चिपळूण काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. नागपूर अधिवेशनात याबाबत आ. शेखर निकम यांनी लक्षवेधी उपस्थित केली होती, तारांकित प्रश्नही उपस्थित केला होता. याबाबत सातत्याने पाठपुरावा सुरु ठेवला होता. अखेर आमदार शेखर निकम यांच्यासह चिपळूण काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या लढ्याला यश आले आहे. बुधवारी मुंबईत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आ. निकम यांच्याशी चर्चा केल्यानंतर हातपाटी वाळूचा ब्रासचा दर ९ हजारावरुन तीन हजार रुपये करण्यात आला आहे. त्यामुळे आता लिलावाची प्रक्रियाही मार्गी लागेल आणि हातपाटी वाळू परवाने मिळतील. याबाबत आज शासनाने अध्यादेशही जारी केला आहे. . रत्नागिरी जिल्ह्यातील हातपाटी वाळू व्यवसायाला परवानगी मिळण्याबरोबरच ब्रासला वाळूचे दर कमी व्हावे यासाठी हातपाटी वाळू व्यवसायिकांनी हा विषय आमदार शेखर निकम यांच्यासह चिपळूण काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांच्याकडे प्रत्यक्ष भेटीद्वारे मागणी केली होती. यानुसार आमदार शेखर निकम व प्रशांत यादव यांनी महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांचे निवेदनाद्वारे या विषयाकडे लक्ष वेधले होते. तर आमदार शेखर निकम यांनी विधानसभेत तारांकित प्रश्नाद्वारे सभागृहाचे लक्ष वेधून हातपाटी वाळू व्यवसायिकांना न्याय मिळण्याची मागणी केली होती. दरम्यान, नऊ हजार रुपये ब्रासचा दर असल्याने परवानगी, लिलावाची सारी प्रक्रिया अडकून पडली होती. त्यामुळे हातपाटी व्यवसाय करणारे छोटे-छोटे ग्रामीण भागातील व्यवसायिक अडचणीत आले होते. त्यांचे परवाने संपले तरी त्यांना नव्याने परवाने मिळाले नव्हते. त्यामुळे वाळू व्यवसायाबरोबरच चिरा बांधकाम इत्यादी व्यवसाय करणारे मजूरही अडचणीत आले होते. आता आमदार शेखर निकम यांच्यासह चिपळूण काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या प्रयत्नामुळे ब्रासचा दर तीन हजार रुपये ठरल्याचा अध्यादेश शासनाने काढल्याने हातपाटी वाळू परवाने देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयाचे वाळू व्यवसायिकांनी स्वागत केले असून चिपळूण काँग्रेस अल्पसंख्यांक सेल तालुकाध्यक्ष अन्वर जवले यांनी आमदार शेखर निकम व चिपळूण काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांचे आभार मानले आहे. तर वडार, कुंभारसमाजाप्रमाणे हातापाटीने वाळू उत्खनची रॉयल्टी माफ व्हावी, अशीही आमदार शेखर निकम यांची मागणी आहे. हा विषयही आपण लवकरच मार्गी लावू, असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले आहे. यामुळे या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

*दखल न्यूज भारत*