तळोधी मोकासा उपसा सिंचन योजना रद्द करू नये आमदार डॉक्टर देवरावजी होळी

अशोक खंडारे उपसंपादक
गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील दर्शनी गावाजवळ वैनगंगा नदीच्या डाव्या तिरावर तळोधी मोकासा उपसा सिंचन योजनेचे बांधकाम सुरू असून मार्च 2020 पर्यंत 7 .27 कोटी रुपये खर्च करण्यात आले असून यामुळे 6062 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. त्यामुळे सदर सिंचन प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत रद्द करू नये अशी विनंती आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी शासनाला केली आहे
नक्षलग्रस्त आदिवासी गडचिरोली जिल्ह्यात सिंचन प्रकल्पाची कमतरता आहे.त्यात वैनगंगा नदीवर पूर्ण झालेल्या चीचडोह बॅरेजेच्या पाणीसाठ्यातून तळोधी उपसा सिंचन योजना कार्यान्वित होत आहे. या प्रकल्पासाठी लागणारी आवश्यक वनजमीन संपादित करण्यात आलेली असून सर्व प्रकारच्या संविधानिक मान्यता व शीर्ष कामांची सर्व संकल्पने व रेखाचित्र मंजूर आहे.गोदावरी तंटा लवादानुसार महाराष्ट्र राज्याच्या वाट्याला आलेले पाणी गडचिरोली जिल्ह्यात सिंचन प्रकल्प नसल्याने उपयोगात येत नाही. तसेच गडचिरोली जिल्ह्यात वनक्षेत्र जास्त असल्यामुळे पारंपारिक सिंचन प्रकल्प होऊ शकत नाही त्यासाठी वैनगंगा नदीवर बॅरेजेस ची साखळी बंधारे बांधून त्यावर उपसासिंचन प्रकल्पाद्वारे सिंचन प्रस्तावित आहेत. ही योजना पूर्ण झाल्यास जिल्ह्यातील जनतेचे राहणीमान उंचावण्यासाठी मदत मिळेल. मात्र रद्द करण्याचा निर्णय घेतला तर वैनगंगा नदीवर असणाऱ्या 62 .53 द.ल.घ.मी. पाणीसाठा असणाऱ्या चीचडोह बॅरेजेला काहीच अर्थ राहणार नाही. त्याचबरोबर दोन मोठ्या उपसा सिंचन योजनांवरही त्याचा विपरीत परिणाम होईल .त्यामुळे तळोधी मोकासा उपसा सिंचन योजना चालू ठेवणे अत्यंत आवश्यक असून ही योजना कोणत्याही परिस्थितीत रद्द करण्यात येऊ नये अशी विनंती आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी राज्याचे महामहीम राज्यपाल, माननीय मुख्यमंत्री, माननीय जलसंपदामंत्री, व जलसंपदा विभागाचे सचिव यांना पत्राद्वारे केली आहे