महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक व कंत्राटी कर्मचारी सेनेच्या ट्रक चालक-मालक असोसिएशन, घुग्घुस अध्यक्षपदी बंटी घोरपडे यांची नियुक्ती

प्रशांत चरड़े,
चंद्रपुर जिल्हा प्रतिनिधि,
शिवसेना प्रणित महाराष्ट्र शिव माथाडी कामगार सेना महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक व कंत्राटी कर्मचारी सेना ट्रक चालक मालक असोसिएशन,घुग्घुसच्या अध्यक्षपदी बंटी घोरपडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

हि नियुक्ती महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक व कंत्राटी कर्मचारी सेना चंद्रपुर जिल्हाअध्यक्ष बंडुभाऊ हजारे यांनी बंटी घोरपडे यांना नियुक्ती पत्र देऊन केली आहे. बंडुभाऊ हजारे जिल्हाअध्यक्ष महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक व कंत्राटी कर्मचारी सेना, चंद्रपुर यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घराघरात पोहचवावे व महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक व कंत्राटी कर्मचारी सेनेचे कार्य वाढविने तसेच ट्रक चालक मालकांच्या न्याय हक्कासाठी लढा द्यावा असे आव्हान केले.

महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक व कंत्राटी कर्मचारी सेनेच्या ट्रक चालक मालक घुग्घुस असोसिएशनच्या कार्याध्यक्ष उमेश गुप्ता, उपाध्यक्ष बालु राऊत, सचिव मुन्ना यादव, कोषाध्यक्ष शुभम बावनकुळे, सहसचिव भिमा यादव, सदस्य रवि सादलावार,अनिल थुल, आशिष गुंडेटी, मैताब खान, मनिष अध्ये, निषांत गादे, रोहित घोरपडे, शहंशाह खान, हर्षल खेवले यांची नियुक्ती केली आहे.

घुग्घुस हे औद्योगिक शहर असल्याने परिसरालगत वेकोली वणी क्षेत्राच्या अनेक कोळसा खाणी आहे. ऐकेरी ट्रक चालक मालकांच्या अनेक समस्या घुग्घुस शहरात आहे. ऐकेरी ट्रक चालक मालकांच्या न्याय हक्कासाठी हि संघटना स्थापन करण्यात आली आहे असे मनोगत नवनियुक्त अध्यक्ष बंटी घोरपडे यांनी व्यक्त केले आहे.