बेवारस रुग्णाची ओळख असणाऱ्या व्यक्तीने जिल्हा रुग्णालयात साधावा संपर्क

प्रशांत चरड़े,
चंद्रपुर जिल्हा प्रतिनिधि,

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपूर येथील वार्ड नंबर 7 मध्ये दि.18 ऑगस्ट 2020 रोजी एक अनोळखी बेवारस रुग्ण वय 70 वर्ष याला भरती करण्यात आले असून सदर रुग्णाचा नोंदणी क्रमांक 36395 व एमएलसी क्रमांक 9816 आहे. या रुग्णांसोबत कोणतेही नातेवाईक अथवा परिचित व्यक्ती नाही. नातेवाईक अथवा परिचित असणाऱ्या व्यक्तींनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपूर येथील वार्ड नंबर 7 येथे संपर्क साधावा, असे आवाहन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपूरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.भास्कर सोनारकर यांनी केले आहे.