Home अमरावती आदिवासी महिला सरपंच पतीची दबावातून आत्महत्या, पथ्रोटनजीकच्या पार्डी येथील घटना, तिनजण अटकेत,...

आदिवासी महिला सरपंच पतीची दबावातून आत्महत्या, पथ्रोटनजीकच्या पार्डी येथील घटना, तिनजण अटकेत, चार फरार

248

अमरावती(उपजिल्हा प्रतिनिधी, युवराज डोंगरे)
अचलपूर तालुक्यातील जवलापूर पार्डी गट ग्रा पं च्या आदिवासी महिला सरपंच गंगा पवार यांचे पती रघुनाथ पवार वय 42 वर्ष यांनी पोळ्याच्या पाडव्याच्या दिवशी विष प्राशन करुन आत्महत्या केली
जुलै महिन्यात राहुल कडू उपसरपंच, निर्मला बायस्कर रोजगार सेवक, अरविंद कडू यांनी लोकप्रतिनिधी महिला आदिवासी सरपंच गंगा पवार यांना जातीवाचक शिवीगाळ केली होती त्यामुळे गंगा पवार यांनी अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये याबाबतची तक्रार पथ्रोट पो स्टे ला दाखल केली होती त्या तक्रारीवरून पथ्रोट पोलिसांनी आटोपीविरुद्ध गुन्हे दाखल केले होते या प्रकरणात आरोपींना अटकपूर्व जामीन मिळाला होता
जामीन मिळाल्यानंतर पार्डी गावातील राहुल कडू समर्थक गजानन ताडाम ,सुनिल महादेव परतेकी, अनिल बसवंत सोळंके, निलेश उर्फ अंबादास चव्हान, सोनु सागर खनवे(महिला)यांनी सरपंचपती रघुनाथ पवार यांना पत्नी संबंधित खटल्यावरून धमकावले रघुनाथ पवार हे अचलपूर न्यायालयात बयान नोंदविण्याकरिता गेले असता विष प्राशन करुन आपली जिवनयात्रा संपविण्याचा प्रयत्न केला त्यांनी विष प्राशन केल्यानंतर पथ्रोट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले तिथे प्रथमोपचार करुन पुढील उपचाराकरिता त्यांना उपजिल्हा रुग्णालय अचलपूर येथे हलविण्यात आले अचलपूरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असताना आज 20 ऑगस्टला सकाळी आठ वाजता त्यांनी प्राण सोडला
हि माहिती नातेवाईकांना मिळताच उपजिल्हा रुग्णालय गाठून त्यांच्या आत्महत्येस जबाबदार असलेल्या संबंधिताना अटक करावी अशी मागणी केली घटनेचे गांभीर्य लक्षात घेता ठाणेदार मनोज चौधरी तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात पोहचले त्यांनी आदिवासी महिला सरपंच गंगा पवार यांच्या तक्रारींवरुन निलेश उर्फ अंबादास रमेश चव्हान, सोनु सागर खनवे(महिला),अनिल बसवंत सोळंके यांना अटक करुन ताब्यात घेतले तर चारजण फरार झाले याप्रकरणी एकूण सात आरोपीवर भा द वि कलम 376,452,323,504,34नुसार गुन्हे दाखल केले असून घटनेचा तपास ठाणेदार मनोज चौधरी यांच्या मार्गदर्शनात हेमंत येरखडे, सुभाष फुंदे, सुनिल पवार, रोहित मिश्रा, राहुल काळमेघ, चालक बाळू वर्धे, सैनिक नरेंद मोरे करीत आहेत
—–माझ्या पतीवर आरोग्य केंद्रात योग्य उपचार केले नाही संबंधितांनी बयान घेतले नाही असा आरोप गंगा पवार यांनी केला आहे
——-आदिवासी महिला सरपंच गंगा पवार यांच्या तक्रारींवरुन या प्रकरणाचा तपास सुरु आहे सात जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून तीन आरोपींना अटक केली आहे तर चार आरोपी फरार आहेत
श्री मनोज चौधरी,
ठाणेदार, पथ्रोट

Previous articleप.स. आरमोरीचे माजी उपसभापती तथा विद्यमान सदस्य यशवंत सुरपाम यांचे अल्पशा आजाराने निधन.
Next articleबेवारस रुग्णाची ओळख असणाऱ्या व्यक्तीने जिल्हा रुग्णालयात साधावा संपर्क