प.स. आरमोरीचे माजी उपसभापती तथा विद्यमान सदस्य यशवंत सुरपाम यांचे अल्पशा आजाराने निधन.

0
122

 

सदाशिव माकडे (प्रतिनिधी)
(गडचिरोली जिल्हा)

आरमोरी :-
आरमोरी पंचायत समितीचे माजी उपसभापती तथा विद्यमान प. स. सदस्य यशवंत सुरपाम यांचे आज 20 ऑगस्ट 2020 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले ते अरसोडा येथील रहिवासी असून ६७ वर्ष वयाचे होते, त्यांना ताप आले असता ब्रम्हपुरी येथे भरती करते वेळीच जगाचा निरोप घेतला. त्याची अंत्यविधी वैनगंगा नदिवर सायंकाळी ६ वाजता करण्यात आली ते चांगले मनमिळाऊ स्वभावाचे होते तसेच सेवा निवृत्त शिक्षकही होते त्यांच्या पश्चात पत्नी, तिन मुली व एक मुलगा असा बराच मोठा परीवार आहे.