अखेर, अवैद्य दारु बंद करण्यासाठी नरसाळ्याच्या महिला पोहचल्या उपविभागीय पोलीस कार्यालयात, हप्तेखोर पोलीसांमुळे अवैद्य दारु बंद करणार तरी कोन? महिलांचा सवाल

0
84

 

वणी : परशुराम पोटे

मारेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील नरसाळा येथे काही गुंड प्रव्रुत्तीच्या व्यक्तींकडुन एक वर्षापासुन अवैद्य दारु विक्री सुरु असल्याने येथिल गोरगरिब,कष्टकरि सामान्यांचा संसार उद्वस्त होत आहे. तसेच दारुमुळे भांडन तंटे सुद्धा वाढत असुन शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. याप्रकाराला कंटाळुन नरसाळा येथिल महिला व पुरुषांनी मारेगाव पोलीसात अवैद्य दारु बंद करण्यासाठी निवेदन सुद्धा दिले.परंतु येथिल काही हप्तेखोर पोलीसांमुळे अवैद्य दारु विक्री काही बंद होत नव्हती. परिणामी येथिल अवैद्य दारु विक्री करणार्या काही गुंड प्रव्रुत्तीच्या व्यक्तीकडुन उलट तक्रार कर्त्यांनाच धमकावुन आमचे कोनीच काही करु शकत नाही! पोलीसांना हप्ता काही फुकटचा देत नाही! अशा प्रकारचे महिलांना धमकावत असल्याचे यावेळी महिलांनी सांगीतले. मारेगाव पोलीस थातुर मातुर चौकशी करत असल्यामुळे येथिल अवैद्य दारु विक्री बंद करणार तरि कोन? असा प्रश्न महिलांना पडल्यामुळे,अखेर नरसाळ्यातील महिला आज दि.२० आँगष्टला चक्क वणी येथिल उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयावर धडकल्या. व अवैद्य दारु विक्री बंद करण्यासाठी निवेदन दिले. या निवेदनावर पुरुषांसह महिलांच्या अंदाजे दिडसे स्वाक्षर्या होत्या.