अनुसूचित जमातीच्या महिलांना सामान्य परिचर्या व प्रसूतिशास्त्राचे मोफत प्रशिक्षण महिला उमेदवारांनी 31 ऑगस्टपर्यंत सादर करावा अर्ज

164

 

प्रशांत चरड़े,
चंद्रपुर जिल्हा प्रतिनिधि,
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या परिचर्या प्रशिक्षण संस्थेमध्ये सुरू होणाऱ्या सामान्य परिचर्या व प्रसूतिशास्त्र अभ्यासक्रमाकरिता प्रशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या अनुसूचित जमातीच्या इयत्ता 12वी विज्ञान महिला उमेदवारांकरिता 3 वर्षाचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. सदर प्रशिक्षण मोफत असून प्रशिक्षणा दरम्यान मोफत निवास व भोजन व्यवस्था आहे.प्रशिक्षण काळात विद्यावेतन देखील देण्यात येणार आहे. अनुसूचित जमातीच्या महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूरचे प्रकल्प अधिकारी निलय राठोड यांनी केले आहे.

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपूर कार्यालयाच्या अखत्यारीत येत असणारे चंद्रपूर, बल्लारपूर, पोंभुर्णा, मुल,गोंडपिपरी, राजुरा, कोरपना, जिवती, सावली व सिंदेवाही तालुक्यातील इच्छुक पात्र उमेदवारांनी मुंबई महानगरपालिकेच्या https://portal/mcgm.gov.in या संकेत स्थळावर दिनांक 31 ऑगस्ट 2020 पर्यंत ऑनलाइन अर्ज करावा.

सदर प्रशिक्षणाकरिता पात्र उमेदवारांनी अर्ज करण्याची अंतिम तारीख दिनांक 20 ऑगस्ट 2020 पर्यंत होती. परंतु मुंबई महानगरपालिकेच्या नवीन वेळापत्रकानुसार अर्ज करण्याची अंतिम तारीख दिनांक 31 ऑगस्ट 2020 पर्यंत करण्यात आली आहे.