स्‍वच्‍छ सर्व्‍हेक्षण 2020 अंतर्गत बल्‍लारपूर शहराला उत्‍कृष्‍ट गुणांकन

243

 

 

प्रशांत चरड़े,
चंद्रपुर जिल्हा प्रतिनिधि, 

माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या बल्‍लारपूर विधानसभा क्षेत्रातील प्रमुख नगर परिषद क्षेत्र असलेल्‍या तसेच मिनी भारत अशी ओळख असलेल्‍या बल्‍लारपूर नगर परिषद क्षेत्राला स्‍वच्‍छ सर्व्‍हेक्षण 2020 मध्‍ये मिळालेल्‍या उत्‍कृष्‍ट गुणांकनासाठी 10 कोटी रू. किंमतीचे पारितोषीक जाहीर झाले आहे. दिनांक 20 ऑगस्‍ट रोजी केंद्रीय नगरविकास मंत्री हरदीपसिंग पुरी यांच्‍या उपस्थितीत स्‍वच्‍छ सर्व्‍हेक्षण 2020 पुरस्‍कारांचे वितरण ऑनलाईन सोहळयाच्‍या माध्‍यमातुन करण्‍यात आले असून बल्‍लारपूर नगर परिषदेला लाभलेला हा बहुमान नगराध्‍यक्ष हरीश शर्मा, बल्‍लारपूर नगर परिषदेचे पूर्व मुख्‍याधिकारी बिपीन मुद्दा, विद्यमान मुख्‍याधिकारी विजय सरनाईक यांनी हा पुरस्‍कार स्विकारला.

या आधी सुध्‍दा बल्‍लारपूर नगर परिषदेला स्‍वच्‍छता आणि पर्यावरण संवर्धनाच्‍या क्षेत्रात केलेल्‍या उल्‍लेखनीय कामाकरिता महानायक अमिताभ बच्‍चन यांच्‍या हस्‍ते NDTV Cleanothon  हा पुरस्‍कार, मुख्‍यमंत्र्यांच्‍या हस्‍ते उत्‍कृष्‍ट नगर परिषद पुरस्‍कार, महाराष्‍ट्र पर्यावरण नियंत्रक मंडळाचा वसुंधरा पुरस्‍कार, थ्री स्‍टार कचरा मुक्‍त शहर हे बहुमान प्राप्‍त झाले आहे. विशेष म्‍हणून राष्‍ट्रीय स्‍तरावर निवड झालेल्‍या शहरांमध्‍ये विदर्भातील दोन शहरे असून यात चंद्रपूर जिल्‍हयातील बल्‍लारपूर व वरोरा ही शहरे आहेत.

राज्‍याचे माजी अर्थ व वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्‍हयाचे माजी पालकमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने बल्‍लारपूर शहरात विविध विकासकामे पूर्णत्‍वास आली असून या शहराला देखणेपण लाभले आहेत. प्रामुख्‍याने बल्‍लारपूर शहरानजिक देशातील अत्‍याधुनिक सैनिक शाळा, अत्‍याधुनिक स्‍टेडियम, अत्‍याधुनिक बसस्‍थानक, स्‍मार्ट पोलिस स्‍टेशन, नाटयगृह अशी विविध विकासकामे या शहरात पूर्णत्‍वास आली आहे. विशेषतः नगर परिषदेच्‍या माध्‍यमातुन स्‍वच्‍छतेबाबत विशेष काळजी घेण्‍यात आली असून त्‍यासंबंधाने विविध उपक्रमही राबविण्‍यात आले आहे. या आधीही रेल्‍वे विभागातर्फे घेण्‍यात आलेल्‍या स्‍पर्धेत बल्‍लारपूर येथील रेल्‍वे स्‍थानक देशातील सर्वोत्‍कृष्‍ट रेल्‍वे स्‍थानक ठरले आहे.

बल्‍लारपूर नगर परिषदेला लाभलेला हा बहुमान या विभागाचा लोकप्रतिनिधी म्‍हणून माझ्यासाठी अभिमानास्‍पद बाब आहे. या शहरातील नागरिकांनी दिर्घकाळ माझ्यावर भरभरून प्रेम केले आहे. या शहराच्‍या विकासासाठी नागरिकांना जो शब्‍द मी आजवर दिला तो प्राधान्‍याने पूर्ण केला आहे. हे शहर सर्वाधिक विकसित व देखणे शहर म्‍हणून नावारूपास आले याचे सर्वस्‍वी श्रेय बल्‍लारपूरकर नागरिकांचे आहे. या बहुमानासाठी मी बल्‍लारपूरकर जनतेचे नगराध्‍यक्ष हरीश शर्मा, मुख्‍याधिकारी बिपीन मुद्दा, विजय सरनाईक, नगर परिषदेच्‍या उपाध्‍यक्षा सौ. मिना चौधरी, सर्व नगरसेवक, अधिकारी व कर्मचा-यांचे अभिनंदन करतो अशी भावना आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्‍यक्‍त केली आहे.