Home चंद्रपूर  आपल्या गावात कोराना रुण्य वाढु नयेत,यासाठी योग्य ती काळजी घ्यावी- मनिषाताई चिमुरकर...

आपल्या गावात कोराना रुण्य वाढु नयेत,यासाठी योग्य ती काळजी घ्यावी- मनिषाताई चिमुरकर जि.प.सदस्या हिरापुर गावात माॅस्क आणि साॅनीटाझर वाटप..

140

 

सावली ..सुधाकर दुधे
सावली तालुक्यातील हिरापुर येथे कोविड -19 अंतर्गत एकूण 6 व्यक्ती बाधित झाले होते दिनांक 11ऑगस्ट 2020 पासुन हिरापुर गांव संपूर्ण लॉकडाऊन मध्ये आहे.
चंद्रपुर जिल्ह्यात अबाधित असणारा सावली तालुका येथे सुरुवातील तिन व्यक्ती पॉझिटिव्ह निघाले होते ते तिन्ही व्यक्ती बाहेर जिल्हातून आले असल्याने त्यांचा संपर्क कुनासोबतही आलेला नव्हता पण हिरापुर येथील सदर व्यक्ती कुठेही न जाता सिमेन्ट रोडवर कामाला गेली होती आणि तिचा व तिच्या मागे बाकी व्यक्ती चा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने संपूर्ण गांव लॉकडाउन करण्यात आले आहे.
त्यामुळे तेथील व्यक्तीचे जनजीवन विस्कळीत झालेले आहे याची माहीती मिळताच क्षेत्राचे जिल्हा परिषद सदस्या सौ.मनिषाताई चिमुरकर यांनी हिरापुर येथे भेट दिली व संपूर्ण परिस्थितीची माहीती घेतली या वेळी त्यांनी अधिकचे रुग्ण सापडु नये म्हणून अधिकाऱ्यांना सुचना केल्या आणि संपूर्ण गावातील लोकांना मास्क आणि सेनीटायझर ऑईल चे वाटप केले या प्रसंगी गावातील सरपंच बंडूजी मेश्राम ग्रामपंचायत सदस्य, नितीनजी गोहणे,मोतीराम चिमुरकर, संजय सायत्रावार ग्रामसेवक, सेडमाके तलाठी आणि सर्व आरोग्य टिम व आधिकारी उपस्थित होते.

Previous articleजि प अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या मदतीने मृत्यूदेह पोहचले स्व:गावी
Next articleहरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांना भारतरत्न द्या ! तालुका प्रमुख सुदर्शन नाईक