जि प अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या मदतीने मृत्यूदेह पोहचले स्व:गावी

 

प्रतिनिधी/रमेश बामनकर

गुड्डीगुडम:- अहेरी तालुक्यातील मौजा मरपली येथील रहिवासी मृतक स्व.गंगाराम दुर्गे दिर्गआजाराने ग्रासले होते.
सदर मृतक स्व.गंगाराम दुर्गे यांना सेवा सदन दवाखाना नागेपली येथे उपचारासाठी भरती करण्यात आले होते.परंतु दिवसेंदिवस त्यांची प्रकुर्ती खालावली जात होते व काल दि.19/आगष्ट रोजी दवाखान्यात मृत्यू झाला होता.त्या कुंटुबाची आर्थिक परिस्थिती गंभीर आहे हे बाब जि.प.अध्यक्ष श्री अजय कंकडालवार यांना समजताच स्व.गंगाराम यांची मृत्यूदेह मरपली पोहचविण्यासाठी स्व खर्चाने चारचाकी वाहन दिले.
या परिसरातील गरीब कुंटुबाना समस्या आल्यास जि.प अजय भाऊ यांनी मदत करण्यास तत्पर असतात
करिता जि प अध्यक्ष श्री अजयभाऊ यांची सर्वत्र कौतुक केल्या जाते.