नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची कौशल्य पूर्ण अंमलबजावणी गरजेची- माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील

 

इंदापूर तालुका प्रतिनिधी, दिनांक:- 20 बाळासाहेब सुतार

महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त इंदापूर महाविद्यालय मध्ये एक दिवसीय राज्यस्तरीय ‘नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण व अध्यापनशास्त्र पुनर्रचना’ या विषयावर ऑनलाइन वेबिनार चे आयोजन करण्यात आले होते यावेळी बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी आपले मत व्यक्त केले.

हर्षवर्धन पाटील म्हणाले की, नवीन शैक्षणिक राष्ट्रीय धोरणामुळे शिक्षण पद्धतीमध्ये पूर्णपणे बदल घडून येणार आहे. यासाठी आपण या धोरणाचा सविस्तर व सखोल अभ्यास करणे गरजेचे आहे. हे धोरण सर्वसामान्यांपर्यंत व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी विद्यापीठांनी आपल्या खांद्यावर घेणे गरजेचे आहे. तसेच अभ्यासक व जाणकारांनी वेबिनार च्या माध्यमातून याची माहिती सर्वत्र कशी पोहोचेल याची दक्षता घ्यावी. येणाऱ्या काळामध्ये आपणापुढे भरपूर संधी शैक्षणिक क्षेत्रामधून उपलब्ध होतील. गुणवत्तापूर्ण शिक्षण तळागळातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आपली सर्वांची असून या नवीन शैक्षणिक धोरणाचे स्वागत करून याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही सर्वांची असणार आहे.’

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी आणि विद्यापीठांची जबाबदारी या विषयावर मनोगत व्यक्त केले.यावेळी त्यांनी शैक्षणिक धोरण व  झालेले महत्वपूर्ण बदल याची सखोल माहिती दिली .भविष्यामध्ये महाविद्यालय व विद्यापीठांमध्ये कोणत्या प्रकारच्या विद्याशाखा राहतील व त्या अंतर्गत अनेक वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करण्याची संधी विद्यार्थ्यांस कशी उपलब्ध होईल याविषयी सविस्तर माहिती दिली. चॉइस बेस्ट क्रेडिट सिस्टम व आंतरविद्याशाखीय अभ्यास यास फार महत्त्व आलेले असून यामध्ये विद्यार्थ्यांना कशाप्रकारचे स्वातंत्र्य राहील याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले .अनेक प्रकारचे विधायक बदल शिक्षणामध्ये अपेक्षित आहेत आणि हे नवीन शैक्षणिक धोरण हे कसे प्रागतिक आहे हे त्यांनी मनोगतातून सांगितले.

यावेळी मनोगत व्यक्त करताना डॉ संजीव सोनवणे संचालक एच. आर .डी. सी, एस पी पी यु, यांनी खऱ्या अर्थाने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण व नवीन अध्यापन पद्धती कशाप्रकारे बदलतील व नवीन अध्यापन पद्धती अंगीकारणे गरजेचे कसे होईल हे उदाहरणासहित विस्तृतपणे मांडले.

याप्रसंगी डॉ सुधाकर जाधवर,सदस्य, व्यवस्थापन परिषद एस .पी. पी. यु .पुणे यांनी गुरुकुल शिक्षण पद्धती पासून ते आतापर्यंत शिक्षणामध्ये झालेल्या विविध बदलांचे व विविध शिक्षण आयोगांची विस्तृतपणे माहिती दिली व आता हे नवीन राष्ट्रीय धोरण अंगीकारणे व देशांमध्ये शिक्षण क्षेत्रात बदल घडवून आणण्याची आपली नैतिक जबाबदारी आहे असे प्रतिपादन केले.

या ऑनलाईन वेबिनार मध्ये भारतभरातील विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक,शिक्षक व विद्यार्थी/विद्यार्थिनी यांनी सहभाग घेतला. बेंगलोर येथील एच.एस. सुरेश, डॉ. बी.पी.पाटील, सीईओ, जळगाव, मा.एम. एस. जाधव , माजी वित्त अधिकारी, डॉ. उत्तम चव्हाण, बामु, औरंगाबाद, डॉ. धनंजय माने, रिजनल डायरेक्टर, वाय. सी.एम. ओ.यु. नाशिक, डॉ. संजय थिगळे, सांगली. इत्यादी मान्यवर सहभागी झाले होते.ह्या वेबिनार चे समन्वयक डॉ. संजय चाकणे व सहसमन्वयक म्हणून प्रा. संदीप शिंदे यांनी काम पाहिजे .आभार प्रदर्शन प्रा. धनंजय भोसले यांनी केले.

Balasaheb Sutar
Reporter
Mob.9850628160