रत्नागिरी जिल्ह्यात आज 73 नवे पॉझिटिव्ह

91

 

प्रतिनिधी / गौरव मुळ्ये.

रत्नागिरी – करुणा पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या 24 तासात जिल्ह्यात एकूण 73 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. यामुळे जिल्हयातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 3130 इतकी झाली.
नव्याने सापडलेल्या रुग्णांमध्ये आरटीपीसीआर मधील रत्नागिरी 22, ॲन्टीजेन टेस्ट मधील रत्नागिरी 4, लांजा 9, कामथे-32, संगमेश्वर 02, लोटे 04 असे एकूण 73 पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. गेल्या दोन दिवसात चिपळूण 75 व 84 वर्षीय असे दोन रुग्ण, रत्नागिरी येथील 49 व 83 वर्षीय असे दोन रुग्ण अशा एकूण 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण 112 जणांचा मृत्यू झाला आहे.

दखल न्यूज भारत