कोरोना रुग्णाची अंत्यविधी जागा स्थलांतर करा आप ची मागणी

128

 

ऋषी सहारे
कार्यकारी संपादक

Covid19 कोरोना च्या अनुषंगाने चंद्रपुर शहरातील मृत्यू पावलेले रुग्ण पठानपुरा ते माना टेकडी रस्त्यावर लागूनच असलेल्या स्मशान भूमीत अंत्यविधी चुपचाप पणे आटोपल्या जात आहे. त्यामुळे त्या परिसरातील फिरायला येणारी प्रौढ, वृद्ध, व्यायाम करायला, पोलीस आर्मी स्पर्धा परीक्षा तयारी साठी येणारे युवक युवतीना त्रास व्हायला लागला आहे. आणि त्या परिसरात भीतीचे वातावरण तयार झालेले आहे .
म्हणून आज आम आदमी पार्टी चंद्रपुर महानगर तर्फे फिरायला येणाऱ्या,व्यायामाला येणा-या आणि पोलीस-आर्मी स्पर्धा परीक्षाची तय्यारी करणारी युवक युवती या सर्वांना एकत्र करून सर्व राजनैतिक पक्षाची लोक मिळून आज गुरुवार दिनांक 20 ऑगस्ट 2020 रोजी चंद्रपुर मनपा आयुक्त यांना निवेदन दिले आणि आयुक्तांनी लगेच उद्या दिनांक 21 ऑगस्ट 2020 ला सकाळी परीक्षण साठी येऊन निर्णय घेण्याची तयारी दर्शविली आहे. हे महत्वाचे.
या प्रसंगी आप चंद्रपुर महानगर चे प्रशांत येरने संघटनमंत्री यांचे नेतृत्वाखाली, योगेश आपटे सहसंयोजक, सुनील भोयर सह संयोजक, अजय डुकरे सहसचिव, राजेश चेडगूलवार सोशल मिडिया, दिलीप तेलंग , अशोक आनंदे सदस्य, भिवराज सोनी जिल्हा कोषाध्यक्ष, आणि सर्वपक्षीय कार्यकर्ते, योगेश तोडे, सुरेश दुरसेलवार, विष्णूभाई नंदूरकर, बनकर , विजय चहारे, कालिदास वाडगुरे, किशोर अकोजवर , वसंत चहारे, प्रकाश आत्राम, रमेश आडे, तळोधिकर, शेलार , अनुप चिवांडे, रुपेश शर्मा, आणि असंख्य जनता उपस्थित होती.असे राजेश चेडगूलवार आप चंद्रपूर जिल्हा , महानगर सोशल मीडिया प्रमुख यांनी प्रेस नोट च्या द्वारे कळविले आहे.