विविध उत्सव सणावर कोरोनाचे निर्बंध तरी अखेर वेशीच्या बाहेर सजली चिकन दुकान

 

प्रतिनिधी/अतित डोंगरे

तिरोडा : अखेर वेशीच्या बाहेर सोसिअल अंतराचे भान राखत वेशीच्या बाहेर पोळ्याचा पाडवा साजरा करण्यास गावा गावात चिकनचे दुकान पहावयास मिळत आहे.
कोविड विषाणूचा प्रसार गाव खेड्यापर्यंत पसरले आहे. यावर मात करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यस्थापन प्राधिकारी तथा जिल्हाधिकारी यांनी सार्वजनिक उत्सव, सणावर बंधने आणून कोरोनाचे रोखथांब करून त्यावर मात करण्यासाठी आदर्श नियमाचे बंधन लादले. या अनुषंगाने जनतेला जन्माष्टमी सारखा सणाची सार्वजनिक मिरवणुकीला निर्बंध घातले.

जतेने यास उत्तम प्रतिसाद देत जन्माष्टमीच्या उत्सव घरापर्यंत मर्यादित करून कानोब्याचे घरीच वित्सर्जन केले.
पंधरा आगष्ट स्वातंत्र्याचा राष्ट्रीय सण असला तरी त्याला घरूनच राष्ट्रीय ध्वजाला सलामी द्यावी लागली आहे.
भारत कृषिप्रधान देश आहे. शेतकरी देशाचा पोशिंदा हे संबोधन हे रूढ झाले आहे. तर शेतकऱ्यांचा मित्र बैल आहे. बैलांकडून वर्षभर शेतकरी कष्ट करवून घेतो. त्याचे पोळा सणाचे दिवशी बैलाचे कष्टाचे सन्मान केला. पोळा सण साजरा करण्याचे पूर्वदिवशी बैलास आवतन दिले. त्याची मोहबैल पूजा केली जाते. पोळ्याचे दिवशी नववारी वधूसारखे सजविले जाते. याचा पाळवा दुसऱ्या दिवशी केले जाते. गावाच्या वेशिजवळ पाडवा मारबत मिरवणूक काढली जाते. शेतातील पीक जोमाने यावे म्हणून किडा, कुटकुर, ढेकूल, मोंगसा घेऊन जा मारबत या घोषणेने सकाळचा प्रहरास सुवात होते. शेतकऱ्यांचे शेतीचे धान लावणी झाल्याचे आनंद असते. बैलांविषयी कृतज्ञता व्यक्त झालेली असते. त्याचा स्वतःचा आनंद दुसऱ्या दिवशी पाडवा म्हणून साजरा केला जातो. घरात स्वयंपाकाचा खमंग दरवडत असतो. मांसाहारी आवडीनुसार खवय्ये मटण, चिकणवर ताव मारतात. आणि पोळ्याचा पाळवा साजरा करतात. त्यामुळे भारतातील पोळा सण अत्यंत जिव्हाळ्याचा सण आहे. कोविडचा संसर्ग लक्षात घेता चिकन विक्रेत्यांनी वेशीच्या बाहेर सामाजिक अंतराचे भान राखून आपली दुकाने थाटली असल्याने चिकनच्या खवय्यांना दिलसा मिळाला आहे.