गडचिरोली जिल्हयात आज 19 कोरोनामुक्त तर 10 नवीन कोरोना बाधित

132

 

सतीश कदडरला/गडचिरोली

गडचिरोली,(जिमाका)दि.20: जिल्हयात आज 19 जण कोरोनामुक्त झाले असून यामध्ये गडचिरोली येथील 16 जणांचा समावेश आहे. यात 2 जिल्हा पोलीस, एसआरपीएफ ग्यारापत्ती येथील 12 जवान, तसेच ग्यारापत्ती पोलीस वसाहतीमधील येथील एक लहान मुलगा, व एक स्थानिक नागरिकाचा समावेश आहे. धानोरा येथील 1 सीआरपीएफ जवान ही आज कोरोनामुक्त झाला. चामोर्शी येथील स्थानिक नागरिक व कोरची येथील आरोग्य विभागामधील कर्मचारी असे एकूण 19 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांना आज दवाखान्यातून सुट्टी देण्यात आली आहे.
तर 10 नवीन कोरोना बाधितांमध्ये रूग्णाच्या संपर्कातील कोरची येथील 2 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर चामोर्शी तालुक्यात 2 यात आष्टी येथील 1 व इतर 1 जण बाधित आढळला. तर ग्रामीण रूग्णालय भामरागड येथील नांदेड येथून आलेला विलगीकरणातील कर्मचारी पॉझिटीव्ह अढळला. गडचिरोली येथील 2 जण इतर बाधित रूग्णांच्या संपर्कातील विलगीकरणात ठेवलेले बाधित आढळले. धानोरा येथील 2 जण बाधित असून आज एकूण 10 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामुळे जिल्हयातील सक्रिय कोरोना बाधितांची संख्या 125 झाली असून एकुण बाधित संख्या 866 झाली आहे. आत्तापर्यंत एकूण 740 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे.