सिंदेवाही पंचायत समिती ला संवर्ग विकास अधिकारी आहेत कां.??? असुनही नसल्यासारखे कां वागतात, कळण्यास मार्ग नाही…!!!

(चंद्रपूर जिल्हा)
भगवंत पोपटे,
नागपूर विभागीय प्रतिनीधी,
दखल न्युज व दखल न्युज भारत.
**********
चंद्रपूर जिल्ह्यातील एकमेव पंचायत समिती अशी आहे की, ज्या पंचायत समिती चे संवर्ग विकास अधिकारी एकदम अकार्यक्षम व निश्क्रिय असल्याचे अनुभवास येत आहे. कारण कार्यालयीन परिसरातील समस्या त्यांचे दृष्टीस येत नाही. त्यामुळे त्या समस्यांची पुर्ती होत नसल्याचे सिद्ध झाले आहे. पंचायत समिती चे मुख्य गेटवरील संरक्षण भिंत अनेक महिन्यांपासून तुटली असतांना, ये, जा करतांना अधिकाऱ्यांना दिसू नये, त्याला काय म्हणायचे. रात्र चांदणे, दिवस चांदणे की, अंधार चांदणे कारण काही व्यक्तींना अंधार चांदणे असले की, सायंकाळी दिसत नाही. त्याप्रमाणे संवर्ग विकास अधिकारी- पंचायत समिती, सिंदेवाही यांना दिवस चांदणे असावे, त्यामुळे त्यांना कार्यालयात जातांना आणि येतांना मुख्य गेटवरील तुटलेली संरक्षण भिंत दिसत नाही. तसेच १३ अॉगष्ट पुर्वीपासून मुख्य रस्त्यावर पडलेला खड्डा आणि त्यात साचलेले पाणी सुद्धा दृष्टीस पडू नये ही खेदजनक बाब आहे.
‌ज्यांचेवर सिंदेवाही
पंचायत समिती संवर्गातील ५१ ही ग्रामपंचायतींचा व त्या ग्रामपंचायतीत मोडणाऱ्या गावांचा विकास करण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेने दिली असतांना, दिलेल्या जबाबदारीचे भान नसावे. तरीही आपण समजून घेऊ या की, संवर्गात अनेक ग्रामपंचायती व अनेक गावे येत असल्याने ग्रामपंचायतींचा वा गावांचा विकास करण्यासाठी वेळ मिळत नसावा, परंतु त्यांचे कार्यालयीन परिसरातील समस्यांवर लक्ष नसने याला काय म्हणावे.?
कार्यालयातून बाहेर पडतांना नजर जाईल अशा ठिकाणी ” जिल्हा परिषद चंद्रपूर” अंतर्गत पंचायत समिती स्तरावर, पंचायत समिती चे आवारात “सौच्यालयांच्या प्रतिकृती तयार केलेल्या आहेत. १) अंगणवाडी सौच्यालव व २) वैयक्तिक सौच्यालय, यांच्या प्रतिकृती ज्या जनतेला बघण्यासाठी तयार केलेल्या आहेत. त्या प्रतिकृती बघून तशाप्रकारेच सौच्यालय बांधून तयार करावे. परंतु त्या बांधलेल्या सौच्यालयांच्या प्रतिकृती संपूर्ण कचऱ्याने झाकाळून गेल्या असल्याने कुणाला बघता येणार नाही. अशी अवस्था त्या परिसराची झाली असून, संवर्ग विकास अधिकारी यांचे पुर्णत: दुर्लक्ष झाले असल्याने संवर्ग विकास अधिकारी यांचे कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
‌कार्यालयीन आवारातील समस्यांवर अधिकाऱ्यांचे लक्ष नसावे यासारखी गंभीर बाब ती कोणती. सदर बाबींवर लोकप्रतिनिधी म्हणून मा. सभापती, यांचे सुद्धा दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. तेव्हा सदर बाबींवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी लक्ष देण्याची गरज आहे काय.? असा प्रश्न साहजिकच उपस्थित होतो.