Home चंद्रपूर  निसर्गवासी डॉ. गोविंद मो. गारे (IAS) स्मृती व्याख्यानमाला – 2020

निसर्गवासी डॉ. गोविंद मो. गारे (IAS) स्मृती व्याख्यानमाला – 2020

202

 

दिलीप अहिनवे
मुंबई महानगर प्रतिनिधी
‘दखल न्युज भारत’
मोबा. 9323548658

मुंबई, दि. २० : आदिवासी विचार मंच महाराष्ट्र आणि बिरसा ब्रिगेडच्या माध्यमातून २०१४ पासून सह्याद्री मध्ये एक वैचारिक, सांस्कृतिक चळवळ सुरु आहे. याचेच फलित म्हणजे आज आदिवासी बांधव आपल्या संस्कृतीच्या अधिक जवळ जात आहे. जगाच्या पाठीवर आदिवासी विद्यार्थी कुठल्याही स्पर्धेत मागे पडू नये. यासाठी पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात एक आगळावेगळा उपक्रम सुरु करण्यात येणार आहे. भीमाशंकर जवळ पालखे वाडी येथे निसर्गवासी डॉ. गोविंद मो. गारे शैक्षणिक, सांस्कृतिक केंद्र आणि भव्य क्रीडा संकुल उभा करण्याचा आदिवासी विचार मंच आणि बिरसा ब्रिगेडचा मानस आहे. या उपक्रमाला समाजाकडून चांगला प्रतिसादही मिळत आहे. लवकरच आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांसाठी त्याचा उपयोग होणार आहे.

सह्याद्रीत सुरु असलेली ही वैचारिक क्रांती कुठेही थांबू नये. प्रबोधनात कुठेही खंड पडू नये. यासाठी लॉकडाऊनच्या काळात फेसबुक live च्या माध्यमातून एक वेबिनार सिरीज चे आयोजन करण्यात आले होते. संपुर्ण भारतभरातून अनेक आदिवासी समाज कार्यकर्ते यांना आमंत्रित करुन समाजबांधवांसाठी त्यांचे मार्गदर्शन ठेवण्यात आले होते. याला भरघोस प्रतिसाद मिळाला.

म्हणूनच येत्या शनिवार पासून खास केंद्रीय लोकसेवा आयोग, राज्य लोकसेवा आयोग आणि इतर स्पर्धा परीक्षा देऊ इच्छितात अशा विद्यार्थ्यांसाठी निसर्गवासी डॉ. गोविंद गारे (IAS) स्मृती व्याख्यानमाला सुरु करत आहोत. महाराष्ट्र तसेच संपुर्ण भारतातील या परीक्षांमधून पास झालेले आदिवासी समाजातील अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. यात IAS, IPS, IRS , राज्य सेवा स्पर्धा परीक्षा तसेच इतर स्पर्धा परीक्षांमधून पास झालेले अधिकारीही असणार आहेत.

शनिवार, २२ ऑगस्ट २०२० रोजी संध्या. ६.४५ वा. व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफले जाणार आहे. त्यावेळेस प्रमुख वक्ते डॉ. सुधीर जाखेरे साहेब ( IPoS) तसेच मुरलीधर बांडे साहेब (सह आयुक्त, GST) यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून आपले करिअर करायचे आहे. अशा विद्यार्थ्यानी या व्याख्यानमालेचा नक्कीच लाभ घ्यावा. ज्यांना व्याख्यानमाले विषयी अपडेट हवे आहेत, किंवा ज्यांना सहभागी व्हायचे आहे, त्यांनी खालील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.

संपर्क :-
विजय विरणक 9404613755, 77768 85184,
भाऊसाहेब गंभीरे 9869128367,
रोहिदास वाजे 9975886982.

Previous articleसंजय गांधी/श्रावण बाळ योजना लाभार्थ्यांना जाहीर आवाहन
Next articleसिंदेवाही पंचायत समिती ला संवर्ग विकास अधिकारी आहेत कां.??? असुनही नसल्यासारखे कां वागतात, कळण्यास मार्ग नाही…!!!