संजय गांधी/श्रावण बाळ योजना लाभार्थ्यांना जाहीर आवाहन

135

 

अकोट शहर प्रतिनिधी
स्वप्नील सरकटे

कोरोना च्या पार्श्वभूमीवर शासनातर्फे एप्रिल ते जून २०२० अखेर तीन महिन्याचे आगाऊ(पुढील येणाऱ्या महिन्याचे) अर्थसाहाय्य अनुदान मे. २०२० या महिन्यात सर्व लाभार्थींच्या खात्यात जमा करण्यात आले होते. जुलै २०२० या महिन्याचे अर्थसहाय्य ऑगस्ट २०२० च्या पहिल्या आठवड्यात खात्यात वर्ग करणे अपेक्षित होते. तथापि शासनाकडून अद्याप तहसिल कार्यालयाकडे अनुदान वितरीत झाले नाही, तसेच केव्हा वितरित होईल याची निश्चित माहिती उपलब्ध नाही
तरी सर्व लाभार्थ्यांना आवाहन करणेत येत आहे. की शासनाकडून अनुदान प्राप्त होताच विनाविलंब लाभार्थ्याच्या खात्यात अनुदान वर्ग करणेत येईल.तहसिल कार्यालयाकडे केवळ या कामासाठी येऊन आपला वेळ व पैसा खर्च करू नये ही विनंती. कोणतीही कागदपत्रे किंवा कोणताही दाखला या कार्यालयाने मागणी केलेला नाही.कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका
काही शंका/ विचारणा करायची असल्यास हरीश गुरव नायब तहसीलदार 9404974306/7972671227 या क्रमांकावर संपर्क करावा.