एफआरपी चा फरक त्वरीत जमा करा अन्यथा उसाचे एकही कांडे कारखान्यात येऊ देणार नाही:- प्रभाकर देशमुख

0
112

 

सोलापूर ग्रामीण प्रतिनिधी ॥ ऋषीकेश

मंगळवेढा तालुक्यातील भैरवनाथ, युटोपियन दामाजी, फॕबटेक या कारखान्याची या गळीत हंगामात गेलेल्या उसाची एफ आर पी च्या साखर कायद्याप्रमाणे  एफ आर पी ची पूर्ण रक्कम  ऊस उत्पादकांच्या खात्यावर जमा न केल्यामुळे कारखानदारांवरती त्वरित फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा. तसेच संबंधित कारखानदारांनी मागील हंगामातील एफ आर पी चा फरक त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावा या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेच्या वतीने आजपासुन मंगळवेढा प्रांत कार्यालयासमोर बेमुदत धरणे सुरु असुन मंगळवेढा तालुक्यातील भैरवनाथ युटोपियन दामाजी फॕबटेक, या कारखान्याची 2019-20 या गळीत हंगामात गेलेल्या उसाची एफआरपी फरक पूर्णपणे अद्याप ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे खाते वरती जमा केली नाही. कारखानदारांनी एफआरपीचा कायदा तर पायाखाली तुडवलाच.परंतु सहकारमंत्री देखिल कान असुन बहीर्याची व डोळे असुन अंधळ्याची भुमिका घेत आहेत.तसेच साखर सहसंचालक यांनी देखिल कारखानदारांशी अर्थिक व्यवहार केली असल्याची शक्यता नाकारता येत नाही व जिल्ह्यामधे त्यांना कुठेही अडवून जाब विचारणार असल्याचे देशमुख म्हणाले. यामधे प्रांताधिकारी यांनी लक्ष घालुन त्वरीत आंदोलनाची दखल घ्यावी अन्यथा येणार्या गळीत हंगामात संबंधित एकाही कारखान्याला ऊसाचे कांडे जाऊ देणार नसल्याचा ईशारा देशमुख यांनी दिला. यावेळी मा.पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे सर यांनी आंदोलन स्थळी उपस्थिती दर्शिवली व न्याय मिळे पर्यंत सोबत असल्याचे त्यांनी सांगीतले.तसेच बहुजन असंघटीत कामगार संघटना महाराष्ट्र राज्य प्रदेश सचिव येताळा खरबडे यांनी ही आदोलनास सशर्त पाठींबादिला.यावेळी उपस्थित  रघु चव्हाण, बिरुदेव ढेकळे, पप्पू दत्तू ,बाळासाहेब नागणे, शिवाजी कांबळे, बलभिम माळी,शिवाजी जाधव, सुनिल पुजारी, सुखदेव डोरले,सर्जेराव गाडे,ज्ञानेश्वर पवार,आप्पा भुई, सिताराम पाटील, संजय हणमणे सर्वश्वर शेजाळ, मारुती भोरकडे, गणपत ढेकळे, हरी चव्हाण, शामराव पुजारी , राहूल पवार,तसेच मोठ्या संख्येने ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.