इटीयाडोह प्रकल्पग्रस्त 39 वर्षा पासून आजही उपेक्षितच. नौकरीत सामावून घ्या नाहीतर आत्मदहनाची परवानगी द्या. मा.विजय वडेट्टीवार यांना प्रकल्पग्रस्त जितेंद्र ठाकरे यांची मागणी

100

 

सदाशिव माकडे (प्रतिनिधी)

आरमोरी:-
इटियाडोह प्रकल्पाचे शेती संपादित करण्याचे काम १९८० मध्ये पूर्ण झाले. त्यात काही अटी व शर्तीवर शेतजमीन संपादित करून शेतजमीन मालकाच्या घरातील कोणत्याही एका सदस्यास नौकरीवर सामावून घेण्याचे प्रमाणपत्र दिलेले आहे.
इटियाडोह प्रकल्पात शेतजमीन संपदीत केल्याले आज 39 वर्ष पूर्ण होऊनसुध्दा त्या कुटुंबातील सदस्यास नौकरीत सामावून घेतले नाही यामुळे सदर परिवारातील सदस्यांना अनेक हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत आणि बेरोजगारीचे दिवस पहावयास मिळत आहे तसेच वेळोवेळी मंत्रालयाच्या पायऱ्या चढू-चढू चप्पल झिजयला लागली आहे.
दि१६/०८/२०२० ला मा.विजय वडेट्टीवार, इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण विभाग, खार जमीन विकास,आपत्ती व्यवस्थापन मंडळ व पुनर्वसन मंत्री गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरीला आले असतांना प्रकल्पग्रस्त शेतकरी केशव ठाकरे यांचा मुलगा जितेंद्र ठाकरे यांनी वरील प्रकारणाबद्दल निवेदन देऊन आत्मदहणाची परवानगी मागितली आहे.